बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) कलाविश्वाला मोठा धक्का बसला. तो म्हणजे, प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने. राजू मागील 41 दिवस मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, आता ते या लढाईत अपयशी ठरलेत आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतलाय. त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबतच आख्खी इंडस्ट्री हादरून सोडली. त्यांच्या निधनावर चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. अनेकांना विश्वासच बसत नाहीये की, राजू आपल्यात नाहीयेत. अशात मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिनेदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राजूंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हेमांगीची पोस्ट
अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या निधनासंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये राजूंच्या वेगवेगळ्या भूमिकांचे वर्णन केले आहे. यासोबतच तिने राजूंची आठवण कायम काढली जाईल असेही सांगितले आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर चाहतेही भावूक होऊन कमेंट्स करत आहेत.
हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “आज गजोधर, यादव, संगठा, बिर्जू, बॉम्ब स्फोटातला माणूस, मुलाखत घेणारा पत्रकार, पुरात हरवलेल्या नवऱ्याची बायको, लग्नाच्या जेवणावळीतला चाचा, रिक्षावाला, ताटातले पापड उडवणारा फॅन, ताटातल्या जागेअभावी एकत्र झालेले पनीर, लोणचं, सलाड, थोडासा बच्चन सगळे एकटे पडले. पोट दुःखेस्तोवर आणि हसवून हसवून डोळ्यात पाणी आणणारा, स्टँड अप कॉमेडीला वेगळं ग्लॅमर आणि प्रोफेशनल स्टँड देणारा सगळ्यांचा आवडता अभिनेता. राजू श्रीवास्तव! तुझी आठवण येत राहील.”
View this post on Instagram
हेमांगीच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करून प्रतिक्रिया देत आहेत. एकाने कमेंट करून लिहिले की, “भावपूर्ण श्रद्धांजली.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “भावपूर्ण श्रध्दाजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.” आणखी एकाने लिहिले की, “खरोखर वाईट बातमी.”
यावरून लक्षात येतं की, राजू हा फक्त काही चाहत्यांसाठीच मर्यादित नव्हता, तर तो भारतातील सर्वांचा आवडता कॉमेडियन होता. तो जरी आज या जगात नसला, तरीही तो त्याच्या कॉमेडी, अभिनय आणि चांगल्या कामांसाठी कायम सर्वांच्या आठवणीत राहील.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शाहरुख खानची पत्नी होणे गौरी खानसाठी अडचणीचे ठरले, म्हणाली, ‘लोकांनी मला काम…’
अभिनेते महेश ठाकूर यांनी पोलिसांकडे केली तक्रार; 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
राजूंच्या निधनानंतर ‘या’ स्टँडअप कॉमेडियनची घसरली जीभ! म्हणाला, ‘बरं झालं आम्ही सुटलो…’