कलाकार आणि सोशल मीडिया यांचे नाते खूपच अनोखे आहे. आपल्या मनातील विविध भावना, विचार, मतं हे सगळ्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियाचे महत्व लक्षात घेऊन अनेक कलाकार या माध्यमाचा उत्तम वापर करताना दिसतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक व्यायसायिक आयुष्याशी संबंधित विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिच्या पोस्ट तिला मोठ्या प्रमाणावर लाईमलाइट देखील मिळवून देतात. कधी कधी तिच्या पोस्टमुळे हेमांगीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.
नुकतीच हेमांगीने एक नवीन पोस्ट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहे. कलाकारांना नेहमीच त्यांच्या कामामुळे आणि कामाच्या कमिटमेंट्समुळे कामाच्या ठरलेल्या तासांपेक्षा अधिक तास देखील काम करावे लागते. याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर तर होतोच मात्र सर्वांसाठी आवश्यक असणाऱ्या झोपेवर देखील त्याचा परिणाम होतो. कलाकारांना हवी तेवढी झोप देखील कामामुळे घेता येत नाही. मात्र हेमांगीला नुकतेच काही वेळ मोकळा मिळाला आणि तिने त्याचा सदुपयोग करत चांगलीच झोप काढली. याच संदर्भात तिने तिची पोस्ट शेअर केली आहे.
हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “बऱ्याच दिवसांपासून कामानिमित्त बरीच धावपळ, प्रवास चालू होता, झोपेचं खोबरं झालं होतं. काल लवकर pack up झाल्यामुळे व्यवस्थित झोपायला मिळालं आणि मी ही घोडे बेचके झोपून गेले, 16 तास. झोपेचा backlog भरून काढल्यासारखं झालं. आज उठल्यावर इतकं कमाल वाटत होतं. मन, डोकं सगळं थार्यावर असल्यासारखं. Energy revive झाली आणि कोऱ्या पाटीने पुन्हा कामाला सुरुवात. आपल्या सुखाचं आणि दुःखाचं मूळ कारण झोपच आहे याचा साक्षात्कार झाला!”
यावरून आपल्या लक्षात येईल की कलाकार आपले मनोरंजन करण्यासाठी किती गोष्टींचा त्याग करतात. सध्या हेमांगी कलर्स मराठीवरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा