‘हमारा आदमी का ढाप्या नहीं है’, म्हणत हेमांगी कवीने केला तिचा रावडी लूक शेअर

आपल्या बिनधास्त वागण्यामुळे अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) नेहमीच चर्चेत राहते. सोशल मीडियावर तिच्या वाढत्या वावरामुळे तिच्या फॉलोवर्सची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ती तिचे अनके फोटो आणि व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. मागील काही दिवसांपूर्वी ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. अशातच तिने एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.

हेमांगीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने जीन्स आणि टॉप घातला आहे. तसेच पायात शूज घातले आहेत. यामध्ये तिचा रावडी लूक दिसत आहे. या फोटोमध्ये ती कोणत्यातरी सेटवर दिसत आहे. (Hemangi Kavi share her photo on social media with funny caption)

हा फोटो समोर फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुमच्या चांगल्या लाईक्स आणि कमेंटमुळे ऍडशूट.” यासोबत तिने लिहिले आहे की, “गोविंदा कसम यह अपुन का ही टी-शर्ट है, हमारा आदमी का ढाप्या नहीं है!” तिचे हे मजेशीर कॅप्शन सगळ्यांना खूप आवडले आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांचे मत व्यक्त करत आहेत. काहि दिसवांपूर्वी तिने तिच्या नवऱ्याचे टी-शर्ट घालून काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करून तिने लिहिले होते की, “महिन्यातून एकदा तरी नवऱ्याचे कपडे ढापायचं हे ठरलंय आपलं.” तिची ती पोस्ट देखील चांगलीच व्हायरल होत होती.

आता तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘आप के आ जाने से’ या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने “ऑन पब्लिक डिमांड”, असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत.

हेमांगीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने, ‘बंदिशाळा’, ‘पिपाणी’, ‘धुडगूस’, ‘डावपेच’, ‘मनातल्या मनात’, ‘पारध’, ‘भूतकाळ’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘गोळाबेरीज’, ‘कोण आहे रे तिकडे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. यासोबत तिने ‘तेरी लाडली मै’ आणि ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांमध्ये काम करून तिचे नाव कमावले आहे. सध्या ती चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मागील काही दिवसांपूर्वी ती ‘बाई ब्रा आणि बुब्स’ या प्रकरणामुळे खूप चर्चेत आली होती.

हेही वाचा :

‘डार्लिंग’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा, टकाटक जोडी करतीये प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन

‘गोष्ट काळाइतकीच जुनी’, म्हणणाऱ्या मिथिला पालकरचा आयकॉनिक लूक पुन्हा एकदा चर्चेत

हातावरील टॅटूमागील गोष्ट सांगत, ‘जीव माझा गुंतला’ मधील ‘मल्हार’ने केला खास फोटो शेअर

 

Latest Post