‘डार्लिंग’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा, टकाटक जोडी करतीये प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन


महाराष्ट्रात कोरोनाचे संकट सावरले आणि चित्रपट प्रेमींना वेध लागले ते चित्रपटगृह खुली होण्याचे. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने कोरोना नियम शिथिल करून ५०% क्षमतेने चित्रपटगृहे खुली करण्यास परवानगी दिली. अशातच मराठीत ‘झिम्मा’ आणि ‘पांडू’ या चित्रपटांनी चांगले यश मिळवले. अशातच ‘डार्लिंग’ या चित्रपटाचा देखील चांगलाच बोलबाला चालू आहे. नुकतेच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि सर्वत्र धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटात प्रथमेश परब (Prathmesh Parab) आणि रितिका श्रोत्री (Ritika Shrotri) ही टकाटक जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘टकाटक’ या चित्रपटानंतर ‘डार्लिंग’ या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना जबरदस्त पसंतीस पडली आहे. समीर आशा पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘अ स्ट्रेस बस्टर फॅमिली एंटरटेंनमेंट’ ही ‘डार्लिंग’ चित्रपटाच्या पोस्टवर टॅगलाऊन आहे. (Darling movie get good response from audience)

चित्रपटाच्या नावावरून ही एक प्रेमकहाणी असावी असे सगळ्यांना वाटते. परंतु ही एका कुटुंबाशी सबंधित कहाणी आहे. हा चित्रपट सध्या महाराष्ट्रात चांगलाच गाजत आहे. हा चित्रपट २५० हून जास्त चित्रपटगृहात ३००० पेक्षाही जास्त स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील गाण्यांना देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कित्येक ठिकाणी शो हाऊसफुल आहेत. या चित्रपटाच्या आणखी एका पोस्टरवर एक मुलगी लग्नाच्या वेशात तिच्या वडिलांच्या पाया पडताना दिसत आहे. या पोस्टरवर लिहिले आहे की, “प्रत्येक मुलगी असतेच कुटुंबाची डार्लिंग.”

चित्रपट सगळ्यांना खूप आवडत आहे. चित्रपटाचे शो असेच हाऊसफुल राहिले, तर येणाऱ्या काही दिवसात हा चित्रपट ‘झिम्मा’ आणि ‘पांडू’ या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडेल असे मत अनेकजण मांडत आहेत.

हेही वाचा :

‘गोष्ट काळाइतकीच जुनी’, म्हणणाऱ्या मिथिला पालकरचा आयकॉनिक लूक पुन्हा एकदा चर्चेत

हातावरील टॅटूमागील गोष्ट सांगत, ‘जीव माझा गुंतला’ मधील ‘मल्हार’ने केला खास फोटो शेअर

सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग करणार एकत्र तिसरा चित्रपट, स्कॉटलंडमध्ये झाला शूटिंगला आरंभ

 


Latest Post

error: Content is protected !!