मराठी चित्रपटांकडे अनेकदा एक प्रयोग म्हणून पाहिले जाते. मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच वेगवेगळे विषय हाताळले जातात आणि मुख्य म्हणजे अशा सिनेमाचे प्रेक्षकांकडून देखील कौतुक केले जाते. त्यामुळे निर्मात्यांना दिग्दर्शकांना देखील रिस्क घ्यायला अवघड जात नाही. सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये परेश मोकाशी यांच्या ‘वाळवी’ या सिनेमाची तुफान चर्चा रंगली आहे. सिनेमाचं उत्कंठावर्धक ट्रेलर, कलाकारांचा प्रभावी अभिनय याबद्दल सतत कानावर येत आहे. सिनेमाच्या ट्रेलरने सगळ्याच प्रेक्षकांची तुफान उत्सुकता वाढवली असून, ट्रेलर खूपच रहस्यमयी आणि आतुरता वाढवणारा दिसत आहे. नुकताच हा सिनेमा मराठीमधील उत्तम दिगदर्शक, अभिनेता असणाऱ्या हेमंत ढोमेने पहिला आणि त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिनेमाबद्दल त्याचे मत वक्त केले.
View this post on Instagram
हेमंतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “एक असतो मराठी सिनेमा आणि दुसरा असतो वाळवी! म्हणजे अतिशय सकस आणि चांगला सिनेमा! मराठीत वेगळे प्रयोग होत नाहीत, सकस पटकथा नसतात… कलाकारांची तद्दन विनोदी तिच तिच कामं असतात… शुटींगचा दर्जा फारच सुमार असतो, साऊंड वगैरे तर बोलायलाच नको नाही का? प्रेक्षकांच्या या आणि अशा अनेक प्रश्नांना कडक दर्जाचं उत्तर म्हणजे आमचा सिनेमा ‘वाळवी’. मी टिमचा भाग नसुनही आमचा म्हणतोय कारण आम्हा सगळ्या कलाकारांना अभिमान वाटावा असा झालाय हा सिनेमा! असे सिनेमे जमून यायला लागते ती एक दर्जेदार टीम! एका कोणाचं नाव घेणं म्हणजे बाकी टिमवर अन्याय आहे…वाळवीतल्या वाळवीने सुद्धा आपलं काम ठोकलंय एवढंच म्हणेन! मी काही समिक्षक नव्हे, मी मराठी सिनेमाचा चोखंदळ प्रेक्षक म्हणून तुम्हाला हक्काने सांगतोय!
वा ळ वी… ब घा च!!! वाळवी तुमचं मनोरंजन करणारच! तुम्हाला मजा येणारच! लवकरच हाऊसफुल्लचे बोर्डस् झळकतील आणि मराठी सिनेमा पुन्हा एकदा अभिमानास्पद केल्या बद्दल माझ्या या लाडक्या टिमचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! चला मंडळी तिकीटं बुक करा!”.
आज #वाळवी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.गेल्या काही वर्षातील मला सगळ्यात आवडलेला सिनेमा.सगळ्यांचे Performance’s कम्माल, परेश आणि मधुगंधा लेखन, दिग्दर्शन अफलातून,विनोदी अंगाने जाणारा रहस्यपट.हा सिनेमा मी कितीही वेळा बघू शकतो #नक्कीबघा #MustWatch @swwapniljoshi pic.twitter.com/SxHTILg0ry
— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) January 13, 2023
यासोबतच अभिनेता संदीप पाठकने ट्विट करत लिहिले, “आज वाळवी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. गेल्या काही वर्षातील मला सगळ्यात आवडलेला सिनेमा.सगळ्यांचे परफॉर्मन्स कम्माल, परेश आणि मधुगंधा लेखन, दिग्दर्शन अफलातून,विनोदी अंगाने जाणारा रहस्यपट. हा सिनेमा मी कितीही वेळा बघू शकतो”,
तत्पूर्वी परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी हरीशचंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ. का.सारख्या सिनेमानंतर वाळवीसारखा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध हॉलिवूड गायिका लिसा प्रेस्ली यांचे वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी निधन
‘तू लगावे जब लिपिस्टिक’ गाण्यावरील किली पॉलच्या व्हिडीओपुढे नेटकऱ्यांना पवनसिंग देखील वाटला फेल