Monday, May 27, 2024

‘तू लगावे जब लिपिस्टिक’ गाण्यावरील किली पॉलच्या व्हिडीओपुढे नेटकऱ्यांना पवनसिंग देखील वाटला फेल

सोशल मीडिया हा असा एक प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर सामान्य लोकं देखील सेलिब्रिटी होतात आणि स्टारडम मिळवतात. या प्लँटफॉर्मने अनेक लोकांना स्टार बनवले असून संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांना पोचवले आहे. आज किली पॉल हे एक असे नाव आहे, जे सर्व लोकांना माहित असून, त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर आल्या आल्या लगेच व्हायरल होत असतात. किली पॉल यांनी भारतातील जवळपास सर्वच भाषांमधील गाण्यांवर त्यांचे व्हिडिओ तयार केले आहेत. आता त्यानी चक्क भोजपुरीमधील एका तुफान हिट गाण्यावर त्यांचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे.

नुकताच किली पॉल यांनी त्यांचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ आहे भोजपुरीमधील सुपरहिट ‘तू लगावे जब लिपिस्टिक’ या गाण्यावर असून, पवनसिंगचा आवाज असलेले हे गाणे तुफान हिट झाले होते. आजही या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते. नुसते भोजपुरीच नाही तर इतर भाषांमधील प्रेक्षकांनी या गाण्याला प्रेम दिले. आता याच गाण्यावर आधारित किली पॉल यांचा नवीन व्हिडिओ सध्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

किली पॉलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “जसे की खूप लोकांनी विनंती केली होती. लेट्स ब्लो दिस अप आणि मी आता अजून अधिक भोजपुरी रिल्स बनवेल.” किली पॉलच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी अमाप प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत ४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून हजारो लोकांनी कमेंट्स करून त्यांचे या व्हिडिओबद्दल कौतुक केले आहे. किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल हे नेहमीच बॉलिवूडच्या गाण्यांवर लिपसिंक करताना दिसतात. त्यांचे हे नवनवीन व्हिडिओ नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात आणि त्यात या दोघे भावाबहिणीची मस्त ऍक्टिंग पाहायला मिळते.

किली पॉल आणि त्याची बहीण असलेल्या नीमा पॉल यांच्या या भोजपुरी व्हिडिओवर कामनेट्स करत एकाने लिहिले, “तुम्ही असेच रील बनवत राहा” दुसऱ्याने लिहिले, “पुढचे गाणे खेसारी लालचे घ्या प्लिज” अजून एकाने लिहिले, “तुम्ही तर पवनसिंगला देखील फेल केले.” तत्पूर्वी किली पॉल काही महिन्यांपूर्वीच भारतात येऊन गेला आहे. त्याची इथे मोठी फॅन फॉलोविंग देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सतत ड्रेस सावरताना दिसली भोजपुरी स्टार आम्रपाली दुबे
हसरा चेहरा इतिहास गेहरा! गौरी नलावडेचा शाइनी लूक

हे देखील वाचा