Saturday, June 29, 2024

वयाने वीस वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीशी असे जुळले सुत! पाहा महालक्ष्मी, रविंद्रनची जगावेगळी लवस्टोरी

सोशल मीडियावरील टीव्ही अँकर आणि अभिनेत्री महालक्ष्मी सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने चित्रपट निर्माते रवींद्रन चंद्रशेखरशी लग्न केले आणि तेव्हापासून तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रवींद्रनसोबत तिचे वैवाहिक जीवन सुरू करताना तिला खूप आनंद झाला असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट चाहत्यांसोबत शेअरही केली आहे.

रवींद्रन आणि महालक्ष्मी यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यापासून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र, या दोघांना एकत्र पाहून धक्कादायक प्रतिक्रिया किंवा आश्चर्य व्यक्त करणाराही एक वर्ग आहे. दोघांना एकत्र पाहून सुरुवातीला लोकांना वाटले की हे चित्रपटाचे शूटिंग असेल, पण नंतर रवींद्रन आणि महालक्ष्मीने स्वतः लग्नाची पुष्टी केली. दोघांच्या लग्नाचा फोटो पाहून एका यूजरने लिहिले की, ही लव्हस्टोरीही यशस्वी होईल अशी अपेक्षा कधीच केली नव्हती.लोक निर्मात्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मूर्खपणाचे बोलत आहेत.

दोघांनी तिरुपतीमध्ये लग्न केले आणि चेन्नईमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टीही दिली. लग्नानंतर, दरम्यान, टीव्ही अँकर महालक्ष्मी आणि रवींद्रन चंद्रशेखरन यांच्या वयातील अंतराबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. महालक्ष्मीचा जन्म 21 मार्च 1990 रोजी झाला असून तिचे वय 32 वर्षे आहे. तर तिचे दुसरे पती रवींद्रन चंद्रशेखरन यांचा जन्म 1 जून 1970 रोजी झाला असून ते 52 वर्षांचे आहेत. अशा प्रकारे दोघांच्या वयात 20 वर्षांचा फरक आहे.

टीव्ही होस्ट महालक्ष्मी निर्माता रविद्रन चंद्रशेखरन यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. मात्र, प्रेमाला वयाची मर्यादा नसते किंवा जन्माचे बंधन नसते. अशी जोडपी लग्नासारख्या पवित्र नात्यातही बांधली जातात. आता या दोघांमध्ये प्रेम कसं फुललं आणि लग्न करण्यामागचं खरं कारण काय आहे याबद्दल बोलूया, यावरही बरीच चर्चा आहे.

महालक्ष्मी आधीच विवाहित असून तिला आठ वर्षांचा मुलगा आहे. आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट देणारी महालक्ष्मी काही काळ अविवाहित जीवन जगत होती आणि आता निर्माते रविद्रन चंद्रशेखरन यांच्याशी लग्न केल्यानंतर तिने पुन्हा वैवाहिक जीवनात प्रवेश केला आहे. अभिनेत्रीचे आधी अनिल कुमारसोबत लग्न झाल्याची माहिती आहे. 2019 मध्ये दोघे वेगळे झाले; त्यांना एक मुलगा आहे.

हेही वाचा – रश्मिका करणार बिग बींसोबत काम, चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
अरेरे! एक दोन नव्हे, राजामौलींच्या ‘बाहुबली’मधील तब्बल 36 सीन चोरलेले? व्हायरल व्हिडिओमुळे खुलास
दिग्गज गायक हरपला! साऊथ इंडस्ट्रीतील सिंगरचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव

हे देखील वाचा