Sunday, July 14, 2024

दिग्गज गायक हरपला! साऊथ इंडस्ट्रीतील सिंगरचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव

साऊथ इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक बंबा बाक्या यांचे निधन झाले आहे. बंबा यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे साऊथ इंडस्ट्री आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बंबा यांनी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या ‘पोन्नियिन सेल्वन‘ आणि ‘इराविन निजल’ यांसारख्या सिनेमासाठी आपला आवाज दिला आहे. खूप कमी लोकांना माहितीये की, गायक बंबा यांनी अवघ्या 8 वर्षांच्या वयात गायनाला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी तब्बल 30 वर्षांपर्यंत संघर्ष केला. त्यानंतर त्यांना बंबा बाक्या म्हणून ओळख आणि यश दोन्ही मिळाले. त्यांच्या निधनामुळे साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने निधन
माध्यमांतील वृत्तांनुसार, 49 वर्षीय बंबा बाक्या (Bamba Bakya) हे दीर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, चेन्नईत हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. असे म्हटले जात आहे की, गुरुवारी (दि. 02 सप्टेंबर) बंबा यांनी अस्वस्थ असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रत्येकाला अशी अपेक्षा होती की, ते लवकर बरे होऊन घरी परततील. मात्र, त्यांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या. बंबा यांचे कमी वयात निधन झाले.

बंबा बाक्या हे त्यांच्या सर्वोत्तम गायकीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी ‘सरकार’ सिनेमातील ‘सिमटांगरन’, ‘रोबोट 2.0’मधील ‘पुलिनंगल’, ‘बिगिल’मधील ‘कलामे कलामे’ यांसारख्या गाण्यांना आपला आवाज दिला होता. बंबा आज या जगात नाहीयेत. अशात त्यांचे शेवटचे गाणे चाहत्यांना भावूक करत आहे. बंबा यांनी मणिरत्नम आणि एआर रहमान यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या सिनेमासाठी शेवटचे गाणे गायले होते. त्यांनी गायलेल्या गाण्याचे नाव ‘पोन्नी नाधी’ असे होते. त्यांनी त्यांच्या आवाजाने प्रत्येक चाहत्याचे मन जिंकले होते.

एआर रहमान यांनी मिळवून दिली ओळख
प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिभा दडलेली असते, पण ती प्रतिभा दाखवण्यासाठी त्याला योग्य व्यासपीठ मिळत नाही. बंबा यांच्यासोबतही असेच काहीसे घडले होते. गायकाने इंडस्ट्रीत सर्वाधिक काम एआर रहमान यांच्यासोबत केले होते. रहमान यांनी 2009मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रावण’ या सिनेमासाठी त्यांना संधी दिली होती. या सिनेमातून त्यांना चांगली ओळख मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रेग्नसीबाबत अंकिता लोखंडे म्हणाली; ‘मी अजून बाळ आहे’, उषा नाडकर्णीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
‘तू आई कधी होणार?’, चाहतीच्या प्रश्नावर संतापली हेमांगी कवी; म्हणाली, ‘हे असले प्रश्न…’
डुप्लिकेट ऐश्वर्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, व्हिडिओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

हे देखील वाचा