×

साऊथच्या ‘या’ हिंदी डब चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडच्या चित्रपटांना पछाडून केला कोट्यवधींचा व्यवसाय

सध्या घडीला बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांचा मोठा दबदबा दिसून येत आहे. कमाईच्या बाबतीत आणि लोकप्रियतेच्या बाबतीत हिंदी कलाकारांना जोरदार टक्कर देताना दिसत आहे. यासोबत प्रेक्षक आणि समीक्षक देखील या चित्रपटांना चांगले रेटिंग देत आहे. या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच नाव कोरले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची कथा, ऍक्शन, कलाकारांचा अभिनय आदी सर्वच गोष्टी प्रेक्षकांना आवडत असल्यामुळेच या चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले जात आहे. याशिवाय काही मोठे सिनेमे हिंदीमध्ये डब करून देखील इतर प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केले जात आहे. यावर्षी तर आतापर्यंत साऊथ चित्रपटांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी चित्रपटांना पछाडून हे सिनेमे आज जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटांपुढे बॉलिवूडमधील मोठमोठे कलाकारांचे सिनेमे देखील फिके पडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

साऊथमधील बाहुबली द बिगिनिंग, बाहुबली द कन्क्लूज़न आणि 2.0 आदी चित्रपटांनी तर दमदार कमाई केली होती, सोबतच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आज तर अशी परिस्थिती आहे, की हिंदी भाषिक प्रेक्षकांना देखील साऊथच्या चित्रपटांची उत्सुकता असते त्या चित्रपटांची आतुरतेने ते वाट बघत असतात. याचे उत्तम आणि ताजे उदाहरण म्हणजे आताच प्रदर्शित झालेला ‘केजीएफ चॅप्टर २’. २०१९ साली आलेल्या केजीएफ सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले या सिनेमाच्या पुढच्या भागाची उत्सुकता मागील २/३ वर्षांपासून प्रेक्षकांना होती. हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

View this post on Instagram

A post shared by Yash (@thenameisyash)

‘केजीएफ चॅप्टर २’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आणि नवीन तयार देखील केले. हिंदी सिनेमानसूनही या चित्रपटाने हिंदी भाषिक प्रदेशात देखील या सिनेमाने अमाप कमाई केली. केजीएफ २ सिनेमाने बॉलिवूडच्या डँगल, संजू, बजरंगी भाईजान आदी चित्रपटांना देखील कमाईच्या बाबतीत मागे टाकले आणि केवळ २३ दिवसांमध्ये ४०० कोटींची तगडी कमाई केली. केजीएफ २ सोबतच आरआरआरच्या हिंदी व्हर्जनने शानदार बिजनेस केला, याशिवाय अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाने देखील चांगली कमाई करत १०० कोटींचा व्यवसाय केला. मुख्य म्हणजे हिंदी भाषेमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये पहिले दोन हे बाहुबली 2 आणि केजीएफ 2 हे दाक्षिणात्य सिनेमे असून, हिंदी सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

चला तर जाणून घेऊया साऊथच्या कोणत्या हिंदी डब चित्रपटांनी किती कोटींचा व्यवसाय केला.

बाहुबली 2: द कन्क्लूजन – 511.30 कोटी रुपये

केजीएफ चॅप्टर 2 – 401.80* कोटी रुपये

आरआरआर – 261.83 कोटी* रुपये

2.0 – 188 कोटी रुपये

बाहुबली: द बिगिनिंग – 120 कोटी रुपये

पुष्पा – 106 कोटी रुपये

केजीएफ चॅप्टर 1 – 44.09 कोटी रुपये

या आकड्यांवरून हे तर पक्की आहे की येणाऱ्या काळात हिंदी भाषिक प्रदेशात आणि बॉलिवूडच्या चित्रपटांवर साऊथच्या चित्रपटांचा दबदबा कायमच असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post