Friday, June 20, 2025
Home अन्य रुको जरा, सबर करो..! विद्यार्थी आंदोलन प्रकरणी कोर्टाकडून हिंदुस्थानी भाऊला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

रुको जरा, सबर करो..! विद्यार्थी आंदोलन प्रकरणी कोर्टाकडून हिंदुस्थानी भाऊला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

विद्यार्थ्यांना भडकावल्या प्रकरणी अटकेत असलेला हिंदुस्तानी भाऊच्या (Hindusthani Bhau) अडचणीत पुन्हा वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण हिंदुस्तानी भाऊच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

प्रसिद्ध यूट्यूबर ‘हिंदुस्तानी भाऊ’ म्हणजेच विकास पाठक सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी १०वी १२वीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेसंदर्भांत भडकावल्या प्रकरणी, त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामुळे सर्वत्र जोरदार चर्चा रंगली होती. अनेकांनी विकास पाठकवर टीकेची झोड उठवली होती. मात्र याच संदर्भात आता मोठी बातमी समोर आली असून, हिंदुस्तानी भाऊच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता विकास पाठकचा मुक्काम जेलमध्येच असल्याच्या बातम्या रंगल्या आहेत.

दरम्यान,विकास पाठकचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग असून यामध्ये सर्वात जास्त तरुण मुलांचा समावेश आहे. तो हिंदुस्तानी भाऊ नावाने यूट्यूबवर प्रसिद्ध आहे. यावरुन तो अनेक विषयांवर आपले मत व्यक्त करत असतो. नुकतेच त्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याने विरोध नोंदवला होता. ज्यामुळे सोमवारी राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. या विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप विकास पाठकवर लावण्यात आला होता. याच कारणामुळे विद्यार्थांना भडकवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद करत पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

तत्पूर्वी अटकेनंतर त्याला अतिसाराचा त्रास जाणवू लागल्याने रूग्णालयात दाखल ही करण्यात आले होते. त्यानंतर त्याला सुनावणीसाठी कोर्टात हजर केले गेले. या प्रकरणात सध्या सर्वत्र विकास पाठकवर टीकेची झोड उठत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा