×

पाकिस्तानी अभिनेत्री करीना कपूरला म्हणाली ‘जाडी!’, दीपिका अन् कॅटरिनाबाबतही केलं ‘हे’ वक्तव्य

पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री हिरा मानीचा (Hira Mani) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या पतीबद्दल बोलताना दिसत आहे. तसेच, या व्हिडिओमध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor), कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्यावरही भाष्य केले आहे. व्हिडिओमध्ये हिरा असे काही बोलताना दिसत आहे, ज्यामुळे नेटकरी तिला खूप ट्रोल करत आहेत.

खरं तर, व्हिडिओमध्ये हिरा तिचे वजन कमी करण्याबद्दल बोलताना दिसत आहे आणि वजन कमी करण्याचे पूर्ण श्रेय तिच्या पतीला देत आहे. हा व्हिडिओ एका मुलाखतीदरम्यानचा आहे, ज्यामध्ये तिचा पती मानीही तिच्यासोबत उपस्थित आहे. हिरा म्हणते, “यावेळी मी जे वजन कमी केले, तेव्हा माझ्याकडे कोणी ट्रेनर नव्हता. माझ्याकडे हा ट्रेनर होता, मानी… आणि त्याने मला वजन कमी करण्यास काय मदत केली. पूर्वीचे कोणतेही ट्रेनर जे करू शकले नाहीत, ते याने केले. कारण माझे वजन खूप वाढले होते, माझे वजन ६४ किलो होते.” (hira mani body shamed kareena kapoor katrina kaif and deepika padukone)

अभिनेत्री पुढे म्हणाली, “एक दिवस मी माझं नाटक पाहिलं होतं. मग मला वाटलं की, ही आंटी कोण आहे? तर मानी म्हणाला, चलो बेटा, मी तुला पळवतो. त्याने ३ महिन्यांत माझे १० किलो वजन कमी केले. जे कोणताही ट्रेनर करू शकत नाही, माझ्या पतीने ते केले. हे मला खूप टोमणे द्यायचे की, कॅटरिनाकडे बघ, करीनाकडे बघ…करीना तरी आता जाड झाली आहे… दीपिकाकडे बघ. मी म्हणायचे की, मी दीपिका आणि कॅटरिना नाही. मला दोन मुले आहेत.”

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच बॉडी शेमिंग केल्याबद्दल नेटकरी अभिनेत्री आणि तिच्या पतीला ट्रोलही करत आहेत. हिरा मानी ही पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post