Saturday, June 29, 2024

म्हणजे यंदा पाळणा हलणार! ‘हे’ सेलिब्रिटी कपल यावर्षी अनुभवणार पालकत्व

हिंदी चित्रपटसृष्टीत यंदा अनेक लोकप्रिय कलाकारांनी लग्नाचा बार उडवून दिला आहे. २०२१ वर्षाची सुरुवात ही काही शाही विवाह सोहळ्यांनी झाली, त्यामुळे ते वर्ष लग्नांनी चांगलेच गाजले. तर आता या वर्षी अनेक अभिनेत्री लवकरच गुड न्यूज देण्याच्या तयारीत आहेत. आज पाहूया अशाच अभिनेत्रींची यादी, ज्या यंदाच्या वर्षी मातृत्व अनुभवणार आहेत.

भारती सिंगहर्ष लिंबाचिया (Bharti Singh- Haarsh Limbachiya)
प्रसिद्ध कॉमेडीयन आणि टीव्ही कलाकार भारती सिंग लवकरच आहे होणार आहे. आपल्या खास अंदाजात तिने सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. या व्हायरल व्हिडिओमध्ये भारती सिंग आणि पती हर्षसोबत त्याचे मित्रही दिसले होते. मात्र प्रेग्नंसी काळातही भारती आपल्या कामात लक्ष देत आहे, ज्यामुळे सगळे तिचे कौतुक करत आहेत.

काजल अग्रवाल (Kalal Aggarwal) – गौतम किचलू 
अभिनेत्री काजल अग्रवालने २०२०मध्ये तिचा बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत विवाह केला होता. यावर्षी काजलने सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट करत आपल्या प्रेग्नंसीबद्दल माहिती दिली. आता लवकरच ती चाहत्यांना गुड न्यूज देणार आहे.

पूजा बॅनर्जी (Puja Banerjee)- संदीप सेजवाल
यंदा आई होणार्‍या अभिनेत्रींमध्ये काही टीव्ही मालिकेतील कलाकारांचा ही समावेश आहे. यामध्ये लोकप्रिय कलाकार पूजा बॅनर्जी च्या नावाचा समावेश आहे. पूजाने २०१७ मध्ये संदीप सेजवाल सोबत विवाह केला होता. सध्या ती प्रेग्नंट असून सोशल मीडियावर नेहमी बेबी बंपचे फोटो शेअर करत असते.

आदित्य नारायण (Aditya Narayana)- श्वेता अग्रवाल
लोकप्रिय गायक आदित्य नारायण आणि पत्नी श्वेता अग्रवाल सुद्धा लवकरच आई बाबा बनणार आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्यने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर करत लवकरच पालक बनणार असल्याचा आनंद साजरा केला होता. यावेळी त्याच्या चेहर्‍यावरील आनंद स्पष्ट दिसत होता.

इकबाल अन्सारी (Iqbal Ansari) – स्नेहा छाबरा
टीव्ही अभिनेता इकबाल अन्सारी आणि त्याची पत्नी स्नेहा छाबराने २००७ मध्ये विवाह केला होता. त्यांनी २०११ मध्ये एका मुलीला जन्मही दिला होता. मात्र आता ते आपल्या दुसर्‍या बाळाच्या स्वागताच्या तयारीला लागले असून लवकरच गूड न्यूज देणार आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा