Friday, April 26, 2024

बॉलिवूडच्या ‘या’ होळीवर आधारित गाण्यांनी करा तुमच्या सणाचा आनंद द्विगुणित

सध्या संपूर्ण देश होळीच्या रंगात न्हाऊन निघत आहे. विविध रंगांची उधळण करत प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जीवनात रंग भरताना दिसत आहे. मनातील सर्व राग. रुसवे विसरून हा सण साजरा केला जातो. होळीच्या रंगांमध्ये मनोरंजनविश्व देखील रंगून गेल्याचे चित्र दिसत असून, टेलिव्हिजन विश्वात तर सर्वत्र रंगांची उधळण होताना दिसत आहे. आपल्या होळीच्या सणाला अधिक खुलवण्यासाठी या सणाचा आनंद, उत्साह अधिक वाढवण्यासाठी आपल्या हिंदी चित्रपटांमधील गाणी नक्कीच उपयोगी ठरू शकतात. देशात जवळपास दोन वर्षांनी खऱ्या अर्थाने, होळी साजरी होणार आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे कोणताही सण नीट साजरा करण्यात आला नव्हता. आता या सणाच्या निमित्ताने सर्वाना थिरकवण्यासाठी बॉलिवूडमधील काही गाजलेली होळीची गाणी कोणती ती जाणून घेऊया. होळी म्हटली की सर्वात अधिक डोक्यात नाव येते ते अमिताभ बच्चन यांच्या ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ मात्र या गाण्यासोबतच अजून कोणती गाणी होळीचा आनंद द्विगुणित करू शकता पाहूया.

होळीच्या सणाला थोडा भक्तीचा रंग चढवत मजा मस्तीत होळी साजरी करण्यासाठी अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या ‘बागबान’ सिनेमातील ‘होरी खेले रघुवीरा’ हे गाणे नक्कीच तुम्हला वाजवता येईल.

अमिताभ बच्चन, ज्या भादुरी, रेखा यांच्या तुफान गाजलेल्या सिलसिला सिनेमातील ‘रंग बरसे भीगे चुनर वाली’ हे गाणे तर आहेच आहे. हे गाणे तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते.

होळीच्या निमित्ताने तरुणांना थिरकवण्यासाठी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमातील ‘बलम पिचकारी जो तूने मुझे मारी’ नक्कीच उत्तम पर्याय ठरेल.

होळीचा सण हा रंगांसोबतच प्रेमाचा संदेश देखील देतो. त्यासाठी शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या ‘डर’ सिनेमातील ‘अंग से अंग लगाना’ हे गाणे देखील हिट ठरेल.

सध्या प्रत्येक सणाला आधुनिक रूप प्राप्त होत असल्याने काही वेळा तुम्हाला तुमच्या सणाचा आनंद वाढवण्यासाठी इंग्लिश शब्द असलेले ‘डू मी ए फेवर, लेट्स प्ले होली, उफ्फ ये होली’ हे गाणे देखील उत्तम पर्याय आहे. अक्षय आणि प्रियांका यांच्या वक्त सिनेमातील अनु मलिक यांचे हे गाणे देखील वाजवू शकतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा