Sunday, February 1, 2026
Home हॉलीवूड ‘या’ सुपरस्टारला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस; मेडिकल स्टाफसोबतचा फोटो शेअर करत दिली अपडेट

‘या’ सुपरस्टारला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस; मेडिकल स्टाफसोबतचा फोटो शेअर करत दिली अपडेट

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जेरेमी रेनर शनिवारी (दि. 07 जानेवारी) त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, वाढदिवशीही तो रुग्णालयात दाखल आहे. खरं तर, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच स्नोप्लोदरम्यान (बर्फ काढण्यासाठी वाहनावर बसवण्यात येणारे यंत्र) गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून सातत्याने जेरेमी रेनर हेल्थ अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत आहे. अशात वाढदिवशी त्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबतचा फोटो इंस्टाग्राम स्टोरवर शेअर करत एक खास मेसेजही लिहिला.

जेरेमीने रुग्णालयातील आयसीयू पथकाला म्हटले ‘धन्यवाद’
अभिनेता जेरेमी रेनर (Jeremy Renner) याने त्याच्या तब्येतीविषयीची माहिती देत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “या खास प्रवासाला सुरुवात करण्यासाठी प्रसिद्ध वैद्यकीय आयसीयू पथकाला धन्यवाद.” खरं तर, अभिनेत्याने हॉस्पिटलमधून शुक्रवारी केलेली ही तिसरी पोस्ट आहे.

Jeremy-Renner-Story
Photo Courtesy: Instagram/jeremyrenner

कधी दिलेली पहिली तब्येतीविषयी माहिती
अभिनेत्याने 3 जानेवारी रोजी तब्येतीविषयी माहिती देणारी पहिली पोस्ट शेअर केली होती. त्याने इंस्टाग्रामवर रुग्णालयाच्या बेडवरील फोटो शेअर केला होता. तसेच, त्याने या फोटोला कॅप्शन देत लिहिले होते की, “तुम्हा सर्वांच्या दयाळू शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Jeremy Renner (@jeremyrenner)

बहिणीने केलेल्या हेअर स्पाचा व्हिडिओही केलेला शेअर
गुरुवारी (दि. 05 जानेवारी) त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला होता. यामध्ये त्याची बहीण त्याचा हेअर स्पा करताना दिसली होती. यादरम्यान भाऊ-बहीण कॅमेऱ्यात हसतानाही कैद झाले होते. या व्हिडिओत अभिनेत्याची आईदेखील दिसली होती.

सोमवारी झाली होती शस्त्रक्रिया
जेरेमी रेनरच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होत आहे. तसेच, त्याचे चाहते तो लवकर बरा होण्याची प्रार्थना करत आहेत. ‘द ऍव्हेंजर्स: एंडगेम’मधील अभिनेत्यावर सोमवारी (दि 02 जानेवारी) शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, “त्यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असून आयसीयूमध्ये आहे.” सध्या जेरेमीची तब्येत सुधारत आहे.

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता
जेरेमी रेनर याची हॉलिवूडच्या सुपरस्टारमध्ये गणना होते. जेरेमीने अलीकडे ज्या सिनेमात काम केले, त्या सर्व सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले, तसेच बॉक्स ऑफिसवरही सिनेमांना चांगले यश मिळाले. त्याला मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये, ऍव्हेंजर्सच्या सर्व सिनेमात आणि नुकतीच आलेली वेबसीरिज ‘हॉकआय’मध्ये क्लिंट बार्टन या भूमिकेसाठी ओळखले जाते. त्याच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तो लवकरच ‘मेयर ऑफ किंग्सटाऊन’च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचा प्रीमिअर येत्या 15 जानेवारी रोजी होणार आहे. (hollywood actor jeremy renner health update jeremy shared picture with medical staff from hospital)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

बाबो! चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका ‘या’ वेब सीरिज
बॉलिवूडमधील स्पर्धेवर अक्षय कुमार स्पष्टच; म्हणाला, ‘मी नंबर वन होण्याच्या शर्यतीत नाही…’

हे देखील वाचा