Thursday, April 18, 2024

संजय दत्तची एक्स पत्नी ‘या’ व्यक्तीसोबत होती रिलेशनशिपमध्ये; ब्रेकअपचे धक्कादायक कारण समोर

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेसला केवळ त्याच्या व्यावसायिकच नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. माध्यमांच्या वृत्तानुसार, लिअँडर पेस आता अभिनेत्री किम शर्मा(Kim Sharma) सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. याबाबतचा खुलासा त्यांनी इन्स्टाग्रामवरून केला होता. याचं वर्षी दोघेही गोव्यात सुट्टी साजरे करताना दिसले होते. लिएंडर पेसचे नाव सेलिब्रिटीसोबत जोडण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही पेसचे नाव महिमा चौधरी(Mahima Chaudhry) आणि रिया पिल्लईसोबत जोडले गेले आहे. महिमासोबतच्या रिलेशनशिपदरम्यानही लिएंडर पेसची संजय दत्तची पत्नी रिया पिल्लईसोबतची जवळीक वाढू लागली होती.

माध्यमांच्या वृत्तानुसार, रिया पिल्लई (Rhea Pillai) आणि लिएंडर पेस(Leander Paes) यांची पहिली भेट 2003 मध्ये झाली होती. यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढली आणि लवकरच दोघेही एकमेकांना डेट करू लागले. माध्यमांच्या वृत्तानुसार, संजय दत्तपासून घटस्फोट घेतल्यानंतर रिया लिएंडरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.

दोघेही पूर्ण आठ वर्षे अमेरिकेत राहिले होते. यादरम्यान, लिएंडर आणि रिया यांना मुलगी अयानाचा जन्म झाला होता. मात्र, 2013 पर्यंत लिएंडर आणि रिया पिल्लई यांच्या नात्यात दुरावा आला होता.

रियाने लिएंडर पेसवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोपही लावल्याचे बोलले जात आहे. रियाने सांगितले की, तिचे आणि लिएंडरचे लग्न झाले आहे, तर टेनिसपटूने लग्न झाले नसल्याचे सांगितले. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर लिएंडरने रियाला दरमहा दीड लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.

मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोमलसिंह राजपूत (Metropolitan magistrate Komalsing Rajput) यांनी या प्रकरणात आदेश दिले. त्यांनी दीड लाखापैकी 50 हजार ही महिन्याचे घरभाडे आणि 1 लाख मेंटेनन्स देण्याचा आदेश लिअँडर पेसला दिला. रिया पिल्लई कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी लिअँडर पेसविरूद्ध 2014 मध्ये कोर्टात गेली होती. याबाबतचा खुलासा त्यांनी इन्स्टाग्रामवरून केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
नवाजुद्दीन सिद्दीकी दक्षिणेत पदार्पण करण्यासाठी सज्ज, व्यंकटेशसोबत ‘सैंधव’ चित्रपटाची घोषणा

…म्हणून सलीम खान ‘जंजीर’ चित्रपटाची कहाणी सांगण्यासाठी गेले होते थेट जया बच्चन यांच्या फ्लॅटवर

हे देखील वाचा