Friday, April 19, 2024

हॉलिवूड अभिनेत्री एरियाना ग्रांडेला मिळत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या, अनोळखी व्यक्तीचा बॉडीगार्डवर चाकू हल्ला

 

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका एरियाना ग्रांडे गेल्या काही दिवसांपासून खूप अडचणींना सामोरे जात आहे. बराच काळ एक व्यक्ती तिला त्रास देत होता. एवढेच नाही, तर तो व्यक्ती तिच्या घरी पोहोचला आणि त्याने एरियानाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याबद्दल आता तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

एरियाने अलीकडेच सांगितले की, ज्या व्यक्तीने तिच्या बॉडीगार्डवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याला तिच्या घरातून अटक करण्यात आली आहे. हा तोच व्यक्ती आहे, जो काही महिन्यांपासून एरियानाला धमकी देत ​​होता. त्याचे नाव एहरॉन ब्राउन असून, तो व्यक्ती बराच काळ तिला त्रास देत होता. गेल्या ७ महिन्यांपासून तो एरियानाला सतत घाबरवत होता.

एरिया ९ सप्टेंबर रोजी घरात होती त्याचवेळी तो व्यक्ती तेथे आला तेव्हा परिस्थिती खूप गंभीर झाली. ब्राऊन चाकू घेऊन तिच्या घरी आला आणि जेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्याला जायला सांगितले तेव्हा तो ओरडला आणि म्हणाला की, “मी तुला आणि एरियानाला मारून टाकेल.”

यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले आणि नंतर पोलीस ब्राऊनला घेऊन गेले. एरियाना म्हणाली की, “मला माझ्या आणि माझ्या कुटुंबाची खूप काळजी वाटत आहे. जर तो तुरुंगातून बाहेर आला, तर तो पुन्हा माझ्या घरी येऊन आमच्यावर हल्ला करू शकतो.”

एरियानाने यावर्षी मे महिन्यात डाल्टन गोमेझशी लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. दोघांच्या लग्नात फक्त २० लोक उपस्थित होते. एरियाना आणि डाल्टन गोमेझ यांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली आणि नंतर दोघांनी डिसेंबरमध्ये साखरपुडा केला. डाल्टन गोमेझ एक इस्टेट बिझनेसमन आहे. लग्नापूर्वी दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. दोघेही एकत्र एकदम परफेक्ट कपल दिसतात.

 

सध्या, एरियाना ग्रांडे आणि डाल्टन गोमेझ लॉस एंजेलिसमध्ये राहत असून, दोघेही वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. तिने अनेक हिट गाणी दिली आहेत आणि तिचा फॅन फॉलोइंग सुद्धा झपाट्याने वाढत आहे. एरियानाने ‘बँग-बँग’, ‘ब्रेक फ्री’ आणि ‘साइट टू साइड’ सारखी हिट गाणी दिली असून, ती आता यावर्षी ‘डोन्ट लुक अप’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

हे देखील वाचा