Saturday, May 23, 2026
Home अन्य एओए बॅन्डची माजी सदस्य आणि के-पॉप गायिका मीनाने केला आत्महत्येचा प्रयत्न; रूग्णालयात करण्यात आले दाखल

एओए बॅन्डची माजी सदस्य आणि के-पॉप गायिका मीनाने केला आत्महत्येचा प्रयत्न; रूग्णालयात करण्यात आले दाखल

एओए बॅन्डची माजी सदस्य के-पॉप गायिका मीना हिने आज (२९ जुलै) सकाळी स्वत: चा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. कोरियन वृत्तपत्रातील वृत्तानुसार, मीनाच्या एका ओळखीच्या व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याचा संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा तो तिच्या अपार्टमेंटमध्ये गेला. त्यावेळी तिथे त्याला मीना बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत मिळाली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे मीनाला हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्वाचे म्हणजे, तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे की, तिच्याबरोबर कोणती घटना घडली आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. खरं तर, या महिन्याच्या सुरुवातीला तिचा पूर्व प्रियकर यू याच्याशी तिने फसवणुकीच्या केल्याच्या वादामुळे ती बरीच चर्चेत आली होती. तेव्हा तिला तिच्या चाहत्यांकडून जोरदार टीकेचा सामना देखील करावा लागला होता. माध्यमातील वृत्तानुसार, मीनाने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. परंतु आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या काही तासांपूर्वीच तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिने बर्‍याच काळासाठी ऑफलाइन राहिल्याबद्दल माफी मागितली आणि त्यानंतर तिने सोशल मीडियावर परत येण्याचा निर्णय घेतला.

https://www.instagram.com/p/CR4NpN4s8TG/?utm_source=ig_web_copy_link

मीनाने या पोस्टद्वारे तिची चिंता केल्याबद्दल तिच्या चाहत्यांची माफी देखील मागितली. मीनाने लिहिले की, “मी माझे शब्द न राखल्याबद्दल मला खरोखर खेद आहे. मी असे म्हणत होते, की मी इंस्टाग्रामवरुन जाऊन आत्मपरीक्षण करण्यासाठी थोडा वेळ घेईन. पण पुन्हा तुमची गैरसोय झाली. मी खूप विचार केला, परंतु यू आणि शिन जिमिनसोबत झालेल्या घटनेने माझे तोंड बंद ठेवले.”

मीनाच्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या या वादांशी तिचा काहीही संबंध नाही. तिने सांगितले की, लोक तिच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवत आहेत. मीनावर तिच्या माजी प्रियकर जिमिनला धमकावण्याचा आरोप होता. मात्र स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले. मीनाने युचे वर्णन ‘एक धूर्त कोल्हा’ असे केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा