Friday, July 5, 2024

हाफ चायनिज! कान्या वेस्टने एलन मस्कवर व्यक्त केला संताप

अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट सतत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतो. त्याच्या वागणुकीला कंटाळून त्याची बायकोदेखिल त्याला सोडून गेली. काही दिवसांपूर्वी त्याचं ट्वीटर अकाउंट सस्पेंड केल्यामुळे त्याने आता ट्वीटरचा नवा मालक एलन मस्क यावर निशाना साधला आहे. कान्याने काही दिवसांपूर्वी एडॉल्फ हिटलर आणि नाजियोंची प्रशंसा केली होती. त्याचे ट्वीट लोकांमध्ये भडकाऊ वातावरण निर्माण करु शकते, त्यामुळे कान्यचे ट्वीटर अकाउंट सस्पेंड केलं. 

अमेरिकेचा प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टर्ण (Kanye West) यचे ट्वीटर अकाउंट सस्पेंड केल्यामुळे त्याने एलन मस्क (Elon Musk) याला चांगलेच सुनावले आहे. त्यांने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “मी एकच व्यक्ती आहे का जो विचार करतोय की, एलन मस्क हाफ चायनिज आहे? एका चायनीजला एका साऊथ आफ्रिकन सुपर मॉडेल सोबत एकत्र करा आणि आपल्याकडे एक एलन आहेच.” (Hollywood news kanye west take a dig on elon musk call him half chinese after his twitter account suspended)

कान्यने पुढे लिहिले की, “मी फक्त एक एलन म्हणतोय…पण त्याने त्याच्यासारखे 10 ते 30 एलन बनवले असतील. तो जेनेटिक हायब्रिड आहे….ओबामांना विसरू नकोस…”, काय लिहिलंय कान्याने मस्क विरोधात. बातमीमध्ये लिंक देखिल जोडली आहे. एकदा नजर टाका त्यावर तेव्हा कान्याचा संताप लक्षात येईल. चर्चामध्ये अपशब्द वापरल्यामुळे मी क्षमस्वी आहे. मात्र, ओबामांसठी माझ्या डोक्यात दुसरा शब्दच येत नाही. YE24 चला संघटित व्हा आणि LUAFO चा शोध घ्या.”

 

View this post on Instagram

 

कान्याची ही पोस्ट पाहून एलनने देखिल एका रिट्वीटद्वारे प्रतिउत्तर देत लिहिले की, “मी याला कॉम्पलिमेंट म्हणून स्वीकारतो.” त्यानंतर कान्याने त्या पोस्टला इंस्टग्रामवर शेअर करत लिहिले की, “मी जे लिहिले आहे त्याला कौतुकच समज माझ्या मित्रा.” कान्याचे असे वक्तव्य करणे हे पहिल्यांदाच नाही. त्याने यापूर्वी देखिल हिंसा घडेल अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे. याचा परिणाम त्याच्या उद्योगवार आणि वैयक्तीक आयुष्यावरही पडला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
राणा दग्गुबतीने विमानतळावरील अनुभव सांगत केली टिका, इंडिगो एअरलाइनने रिट्वीट करत…
हंसिका मोटवानी अडकली विवाह बंधनात, सोशल मीडिवर फोटोंचा कहर

 

हे देखील वाचा