Tuesday, July 9, 2024

Oscar Awards| जेव्हा १५ मिनिटांत १५ लोकांना देण्यात आला पहिला ऑस्कर पुरस्कार, चार्ली चॅप्लिनही ठरला होता विजेता

ऑस्कर हा मनोरंजन क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. दरवर्षी संपूर्ण जगाच्या नजरा या अवॉर्ड शोवर खिळलेल्या असतात. सोमवारी (२८ मार्च) ९४ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये चित्रपटांशी संबंधित प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यंदा विविध गटात कोण विजेता ठरणार, याकडे साऱ्या जगाच्या नजरा लागल्या होत्या. चला तर मग ९४ व्या अकादमी पुरस्काराशी संबंधित नाही, तर पहिल्या अकादमी पुरस्काराशी संबंधित आठवणी जाऊन घेऊया.

पहिल्या ऑस्कर पुरस्काराचा (Oscar Award) विजेता कोण होता आणि त्याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? पहिला ऑस्कर पुरस्कार १५ मे १९२९ रोजी आयोजित करण्यात आला होता. कॅलिफोर्नियातील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. हा केवळ १५ मिनिटांचा कार्यक्रम होता ज्यात १५ जणांना ऑस्कर देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध दिग्दर्शक फेअरबँक्स यांनी केले होते. १९२७ आणि १९२८ च्या चित्रपटांचा यात समावेश होता.

उपस्थित राहण्यासाठी विकली गेली तिकिटे
तर १९२९ मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी तिकिटे विकली गेली. या अवॉर्ड शोची तिकिटे नंतर ५ यूएस डॉलरला विकली गेली. आजपर्यंत हे तिकीट सुमारे ७५ यूएस डॉलर असेल. खरं तर, पहिले अकादमी पुरस्कार रेडिओ किंवा टीव्हीवर प्रसारित केले गेले नाहीत. दुसऱ्या अवॉर्ड शोपासून त्याचे महत्त्व वाढले होते.

कोण होता विजेता
एमिल जॅनिंग्स यांना त्यांच्या ‘द वे ऑफ ऑल फ्लेश’ आणि ‘द लास्ट कमांड’ या चित्रपटांसाठी पहिल्या ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. जेनेट गेनर यांना ७ व्या स्वर्ग, स्ट्रीट एंजल आणि ‘सनराईज: ए सॉन्ग ऑफ टू ह्युमन्स’ आणि फ्रँक बोर्झेज यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे आत्तापर्यंत एमिल जॅनिंग्स हा अकादमी पुरस्कार जिंकणारा पहिला आणि एकमेव जर्मन अभिनेता आहे.

चार्ली चॅप्लिनने देखील जिंकला ऑस्कर
होय, पहिल्या ऑस्करमध्ये चार्ली चॅप्लिनला ‘द सर्कस’साठी विशेष मानाचा पुरस्कार देण्यात आला होता. याशिवाय द जॅझ सिंगरच्या निर्मितीसाठी वॉर्नर ब्रदर्सलाही पुरस्कार देण्यात आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा