Friday, July 5, 2024

OMG! कपाळावर हिरा जडवणे ‘या’ रॅपरला पडले महागात; चाहत्यांनी हिसकावत केले त्याला रक्तबंबाळ

माणूस आपल्या आयुष्यात वेगवेळी स्वप्ने बघत असतो. अशातच या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मोठी मेहनत ही घेतो. कुणाचे एकदातरी विमानात बसायला मिळावे असे स्वप्न असते, तर कुणी चंद्रावर जागा विकत घेण्याचे स्वप्न बघत असतो. या सर्वांमध्ये शरीरावर हिरा लावण्याचं स्वप्न तुम्ही कधी ऐकलं आहे का? नाही ना. परंतु अमेरिकेतील रॅपर लिल उजी वर्टचं हे स्वप्न होतं. ते त्याने पूर्ण देखील केलं.

त्याने आपल्या कपाळावर एक गुलाब रंगाचा हिरा बसवून घेतला आहे. त्याची किंमत तब्बल २४ मिलियन डॉलर म्हणजेच १७५ कोटी रुपये एवढी आहे. एवढा महागडा हिरा कपाळवर लावून फिरण्याचा त्याला चांगलाच फाटका बसता बसता राहिला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्याकडून तो हिसकावण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की, “जुलै महिन्यामध्ये रोलिंग लाउड फेस्ट आयोजित करण्यात आलं होतं. तेव्हा मी चाहत्यांच्या घोळक्यात उडी मारली. मला पाहताच चाहत्यांनी माझ्यावर अतिक्रमण करत माझा हिरा चोरण्याचा प्रयत्न केला.” तसेच त्यामुळे त्याच्या कपाळामधून रक्त येऊ लागले. त्याने या संदर्भात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु काही काळानंतर त्याने ते काढून टाकले. (hollywood rapper lil uzi vert revealed his fans ripped his forehead diamond)

रॅपर लिल उजीचे खरे नाव सिमेरे बायसिल वुड्स आहे. त्याने आपल्या हिऱ्याविषयी सर्वात आधी जानेवारी महिन्यामध्ये सोशल मीडियावर माहिती दिली होती. त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “मी खूप दिवसांपासून पैसे जमा करत होतो. कारण मला माझ्या आवडत्या डिझायनर इलियट एलियंटकडून हा हिरा विकत घ्यायचा होता.” त्यानंतर त्याने आणखी एक ट्वीट करत असे लिहिले की, “मी अनेक वर्षांपासून इलियटकडून गुलाबी हिरा घेण्यासाठी पैसे देत आहे. त्याची किंमत इतकी जास्त आहे की, मी २०१७ पासून यासाठी पैसे देत आहे. मी प्रथमच गुलाबी हिरा पाहिला. तेव्हा पासून मला तो घेण्याची इच्छा निर्माण झाली.” एकदा त्याच्या एका चाहत्याने त्याला त्या हिऱ्याविषयी विचारले होते. तेव्हा त्याने त्याचे वजन ११ कॅरेट असल्याचे सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी जे-जेडच्या ४०/४० क्लबचा १८वा वर्धापन दिवस होता. तेव्हा लिल उजी वर्टला आंमत्रित केले होते. तेव्हा टीएमजेडसोबत बोलताना त्याने या घटनेचा खुलासा केला. तो म्हणाला की, “मला खूप छान वाटत आहे की, अजूनही माझ्याकडे हिरा आहे. त्यामुळे मी खूप चांगलं फील करत आहे.” तो हिरा अजूनही त्याच्याकडेच आहे. त्याचे चाहते त्या हिऱ्याला घेण्यास अपयशी ठरले आहेत. परंतु त्याच्या अनेक चाहत्यांना त्याने हिऱ्याला गमावले असे वाटत होते. कारण लिल उजी बऱ्याच वेळा हिऱ्या शिवाय सगळ्यांसमोर आला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा