Monday, July 15, 2024

स्वत:चे १६.५ मिलियन फॉलोव्हर्स, पण ‘पुष्पा’ करतो ‘या’ एकाच व्यक्तीला फॉलो; कोण आहे ती ‘श्रीवल्ली?’

आयकॉन स्टार म्हणून ओळखला जाणारा अल्लू अर्जुनपुष्पा‘ सिनेमानंतर संपूर्ण भारतात सर्वांचा आवडता बनला आहे. ही कमाल केली आहे १७ डिसेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘पुष्पा: द राईज’ या सिनेमाने. हा सिनेमा एकूण ५ भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात हिंदी भाषेचाही समावेश आहे. त्याच्या ‘पुष्पा’ या सिनेमातील ‘श्रीवल्ली’पासून ते ‘सामी सामी’ या गाण्यांवर जोरदार रील व्हिडिओ तयार होत आहेत. यानंतर तर अल्लूच्या चाहत्यावर्गात कमालीची वाढ झाली आहे. इंस्टाग्रामवर अवघ्या २ महिन्यांच्या आत त्याच्या फॉलोव्हर्समध्ये २ मिलियनहून अधिक वाढ झाली आहे.

मागील महिन्यात १४ जानेवारीला अल्लू अर्जुनने (Allu Arjun) १५ मिलियन फॉलोव्हर्स झाल्याबद्दल पोस्ट शेअर करत धन्यवाद म्हटले होते. आता त्याच्या फॉलोव्हर्सची संख्या १६.५ मिलियन झाली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, इतके सारे फॉलोव्हर्स असूनही अल्लू अर्जुन इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो.

जाणून घ्या अल्लू अर्जुन कोणत्या खास व्यक्तीला करतो फॉलो?
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमाची क्रेझ जगभरात पोहोचली आहे. अभिनेत्यांपासून ते नेत्यांपर्यंत ‘झुखेगा नही’ हा डायलॉग बोलला जात आहे. त्याचबरोबर ‘श्रीवल्ली’ गाण्यावर अनेक क्रिकेटर्सनी रील्सही बनवले आहेत. ज्यांनी हा सिनेमा पाहिला नाही, त्यांच्यापर्यंत या सिनेमाचे संवाद पोहोचले आहेत. चिमुकली मुलंही अल्लू अर्जुनला ओळखू लागली आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे फॉलोव्हर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचवेळी अल्लू अर्जुन फक्त एका व्यक्तीला फॉलो करतो, ती व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी.

हे देखील वाचा