Monday, July 1, 2024

मनीषने भर कार्यक्रमात चालण्यावरून उडवली मलायकाची खिल्ली, परिणीतीपासून वरुणपर्यंत सगळेच हसून बेजार

कलाकार कधी कोणत्या कारणांमुळे ट्रोल होतील, याचा काही नेम नाही. कधी ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येतात, तर कधी ते त्यांच्या फोटो किंवा व्हिडिओंमुळे ट्रोल होतात. मागील काही दिवसांपूर्वीचे रणवीर सिंग याचे न्यूड फोटोशूट हे एक ज्वलंत उदाहरण आहे. ट्रोल होणाऱ्या कलाकारांच्या यादीत अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या नावाचाही समावेश होतो. मलायका तिच्या एका व्हिडिओमुळे चांगलीच ट्रोल झाली होती. त्यावरून आता सूत्रसंचालक मनीष पॉल याने तिची खिल्ली उडवली आहे.

मलायका अरोरा (Malaika Arora) ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिची गणना खूपच स्टायलिश आणि फिट अभिनेत्रींमध्ये होते. ती जेव्हाही वर्कआऊट किंवा सलूनमध्ये घराबाहेर पडते, तेव्हा तिचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असतात. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मलायकाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यामध्ये तिच्या चालण्यावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. एका पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालक मनीष पॉल (Maniesh Paul) यने मलायकाच्या चालण्याची नक्कल केली. इतकेच नाही, तर तो मलायकासोबत खेळण्याऱ्या श्वानांचीही नक्कल करताना दिसला. मनीषचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मनीषने सर्वांसमोर उडवली मलायकाची खिल्ली
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील आहे. यामध्ये सूत्रसंचालक मनीष पॉल मलायकाच्या चालण्याची नक्कल करताना दिसला. मनीष या सोहळ्याला उपस्थित कलाकारांसोबत मजा-मस्ती करत होता. यादरम्यान त्याने मलायकाला विचारले की, “तुम्ही गोल्फ खेळता का?” यावर मलायकाने उत्तर दिले की, “नाही, कधीही गोल्फ खेळले नाही.” यावर मनीष म्हणतो की, “गोल्फ किती दुर्दैवी आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

श्वानांप्रमाणे चालला मनीष
यानंतर मनीष म्हणतो की, “गोल्फ कोर्स वाट पाहत आहे की, तुम्ही त्यावर अशाप्रकारे चाला.” त्यानंतर मनीष वेगाने चालत मलायकाची नक्कल करतो. तिथे उपस्थित परिणीती चोप्रा, विद्या बालनपासून ते वरुण धवन या कलाकारांपर्यंत प्रत्येकजण हसू लागतो. मलायकादेखील हसते आणि मनीषला पुन्हा एकदा तसेच करून दाखवण्यास सांगते. यानंतर मनीष श्वानांची नक्कल करतो आणि म्हणतो की, “तुम्ही जेव्हा त्यांच्या जवळ असता, तेव्हा श्वानदेखील इतकेच खुश होतात.” तो म्हणतो की, “तुम्ही श्वानांना ज्याप्रकारे इशारे करता, आम्हालाही तसेच इशारे करू शकत नाही का, आम्हाला काय बुरशी लागलीये का?” मनीषच्या या बोलण्यावर तिथे उपस्थित सर्वजण जोरात हसू लागतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अर्जुन कपूरसोबत खुश आहे मलायका
मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर ती अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांनीही त्यांचे नाते 2019मध्येच अधिकृत केले होते. मलायका आणि अर्जुन हे एकमेकांवर प्रेम करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीत. त्यांचे प्रेम फोटो आणि व्हिडिओमधून चाहत्यांसमोर येतच असते. आता त्यांच्या चाहत्यांना या जोडप्याच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा हिट करायचा म्हणून सांगितले जातायेत चुकीचे आकडे? बजेटइतकी कमाई करणेही कठीण
महिमाने सगळ्यांसमोर आणलेली बॉलिवूडची काळी बाजू; म्हणालेली, ‘व्हर्जिन अभिनेत्री नसेल, तर…’
‘अगं अगं आई…’, म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा ओंकार दिसणार मुख्य भूमिकेत, पण नायिका कोण?

हे देखील वाचा