×

सुकेशनंतर घसरली ब्रँड व्हॅल्यू, चार वर्षांपासून एकही हिट चित्रपट नाही; मग कसे काय मिळतायेत जॅकलिनला चित्रपट?

ठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ​​अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे (Jacqueline Fernandez) नाव आल्यापासून तिच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये सातत्याने घट होत आहे. दुसरीकडे, अभिनेत्रीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, २०१८ मध्ये ‘रेस ३’ पासून जॅकलिन फर्नांडिसच्या एकाही चित्रपटाने १०० कोटींचा आकडा गाठलेला नाही. जॅकलिन फर्नांडिस अलीकडेच अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चित्रपट ‘बच्चन पांडे’ आणि जॉन अब्राहमच्या (John Abraham) ‘अटॅक’ चित्रपटात दिसली होती. याशिवाय अभिनेत्रीचे आणखी चार चित्रपटही याच वर्षी रिलीझसाठी सज्ज आहेत. आता प्रश्न पडतो की, ब्रँड व्हॅल्यू कमी होऊनही आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप असतानाही अभिनेत्रीला सातत्याने ऑफर्स का मिळत आहेत? चला जाणून घेऊया…

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

सलमान खानमुळे मिळतायेत चित्रपट
जॅकलिनने सलमान खानसोबत (Salman Khan) अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघेही एकमेकांचा सहवास एन्जॉय करतात. लॉकडाऊन दरम्यान जॅकलिन पनवेलच्या फार्महाऊसवर सलमान आणि त्याच्या कुटुंबासोबत राहत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळे जॅकलिनला सात चित्रपटांमध्ये काम मिळाले आहे. यापैकी ‘किक’, ‘रेस ३’ आणि ‘राधे’ हे तीन चित्रपट सलमानसोबत आहेत. त्याचबरोबर सलमान खानचा अत्यंत जिवलग मित्र साजिद नाडियाडवाला याच्या बॅनरखाली चार चित्रपट तयार झाले आहेत. (How Jacqueline Fernandez got movie in bollywood)

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

साजिदसोबत नात्यात असल्यामुळे मिळाले चित्रपट
जॅकलिन चित्रपट निर्माता साजिद खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही गंभीर नात्यात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अनेक वर्षे ते एकत्र होते. अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसले. मात्र, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. विशेष म्हणजे साजिद खानने जॅकलिन फर्नांडिसला तीन चित्रपटांमध्ये साईन केले होते.

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

रितेश देशमुखशीही होते का जॅकलिनचे नाते?
एक काळ असा होता, जेव्हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि माजी मिस श्रीलंका जॅकलिन फर्नांडिस यांच्यात मैत्री वाढत असल्याच्या अफवांनी बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. ‘अलादीन’ चित्रपटात रितेश आणि जॅकलीन पहिल्यांदा एकत्र दिसले, तेव्हा दोघांमध्ये काही आहे असे कोणालाच वाटले नव्हते. पण त्यानंतर जॅकलिनला (रितेशच्या सूचनेनुसार) ‘जाने कहां से आयी है’ या दुसर्‍या चित्रपटासाठी साइन करण्यात आले होते.

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

यानंतर रितेशच्या आगामी ‘हाऊसफुल’ चित्रपटातील ‘अपनी तो जैसे तैसे में’ गाण्यासाठी जॅकलिनला अप्रोच करण्यात आले. तेही जेव्हा चित्रपटात आधीच तीन आघाडीच्या अभिनेत्री म्हणजेच, दीपिका पदुकोण (Deepika Padukone), लारा दत्ता (Lara Dutta) आणि जिया खान (Jiah Khan) होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post