‘आँखों में तेरा ही चेहरा’ गाण्यातील ‘ती’ क्युट अभिनेत्री आज आहे तरी कुठं? जाणून घ्या तीच्याबद्दल सर्वकाही

hrishitaa bhatt she made debut with shahrukh 20 years ago made headlines for married life


साल २००३ मध्ये आलेल्या ‘हासिल’ चित्रपटात अभिनय करून, प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे ऋषिता भट्ट. सुंदर ऋषिताने ‘हासिल’ चित्रपटात अशी जादू केली, की इरफान खान आणि जिम्मी शेरगिल चित्रपटात तिच्या प्रेमात पडले होते. ही अभिनेत्री १० मे रोजी, तिचा वाढदिवस साजरा करते.

ऋषिताचा जन्म सन १९८१ मध्ये मुंबई शहरात झाला होता. तिने आपले महाविद्यालयाचे शिक्षण लंडनमधून पूर्ण केले. ऋषिताला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. तिने कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. क्वचितच चित्रपटांमध्ये काम केले असले, तरी तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान मिळवले होते.

अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी अभिनेत्रीने मॉडेलिंगमध्ये खूप नाव कमावले. मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये, तिने लिरिल साबणाची जाहिरात केली होती, ज्यामुळे ती त्या प्रोडक्टचा चेहरा बनली होती. याशिवाय अभिनेत्री ‘आँखों में  तेरा ही चेहरा’ या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर होता. त्यावेळी हे गाणे बरेच लोकप्रिय झाले होते.

ऋषिताने २००१ मध्ये ‘अशोका’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात ती शाहरुख खानसोबत दिसली होती. यानंतर तिने ‘हासिल’ हा चित्रपट केला. या चित्रपटाद्वारे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली आणि सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. या चित्रपटात इरफान खान, जिम्मी शेरगिल आणि आशुतोष राणाही मुख्य भूमिकेत होते.

याव्यतिरिक्त अभिनेत्रीने ‘दिल विल प्यार व्यार’, ‘अब तक छप्पन’, ‘जिज्ञासा’, ‘पेज ३’, ‘शरारत’, ‘ढूंढ़ते रह जाओगे’, ‘शागिर्द’, ‘अम्मा की बोली’, ‘अनुराधा’, ‘मिस टनकपुर हाजिर हो’ आणि ‘जुनूनियत’ यांसारखे चित्रपट केले.

तसेच, ऋषिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा आपले फोटो चाहत्यांसाठी शेअर करते. अभिनेत्री तेव्हा खूप चर्चेत आली होती, जेव्हा तिने गुप्तपणे लग्न केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तिने ४ मार्च २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांची इच्छा होती की, लग्नात जवळचे लोकच आमंत्रित केले जावे, म्हणून तिने मीडियाला तिच्या लग्नपासून दूर ठेवले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.