कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि ऋतिक रोशनचा (Hrithik Roshan) ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपट चांगलाच गाजला होता. फरहान अख्तर, कल्की केक्लां, अभय देओल यांसारखे कलाकारही या चित्रपटात दिसले होते. चित्रपटाचा प्रत्येक सीन छान शूट करण्यात आला आहे. त्यामुळेच रिलीझ होऊन ११ वर्षे उलटून गेल्यावरही हा चित्रपट पाहिल्यावर जुना वाटतच नाही. तर या चित्रपटातील कॅटरिना कैफ आणि ऋतिक रोशनच्या किसिंग सीनची जोरदार चर्चा झाली होती. सोमवारी (१० जानेवारी) ऋतिकच्या वाढदिवसानिमित्त या चर्चित सीनबद्दल जाणून घेऊया…
छोटा केला किसिंग सीन
जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला तो सीन आठवेल. जेव्हा ऋतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर कारने जात असतात आणि कॅटरिना बाईकवरून त्यांच्या मागे जाते. त्यानंतर ऋतिक गाडीतून खाली उतरतो आणि कॅटरिना त्याला किस करू लागते. हा चित्रपटातील अत्यंत महत्त्वाचा सीन होता. हा सीन नंतर छोटा करून दाखवण्यात आला असला, तरी सुरुवातीला हा सीन बराच मोठा होता. (hrithik roshan and katrina kaif initial kissing scene was shot for 3 minutes)
का एडिट केला गेला किसिंग सीन?
माध्यमातील वृत्तांनुसार, हा किसिंग सीन ३ मिनिटांचा होता, पण तो कमी करण्यात आला होता. या सीनबद्दल दिग्दर्शिका झोया अख्तर आणि सह-निर्माते यांच्यात बरीच चर्चा झाली. त्यानंतर किसिंग सीन छोटा करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे म्हटले जाते की, ३ मिनिटांचा किसिंग सीन खूपच कामुक झाला असता, जे चित्रपटात दाखवण्याची गरज नव्हती आणि म्हणूनच ते एडिट करून लहान केले गेले.
१० वर्षांपूर्वी झालाय रिलीझ
चित्रपट ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ २०११ साली प्रदर्शित झाला होता. झोया अख्तरने याचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि कॅटरिनाची केमिस्ट्री चांगलीच पसंत केली गेली होती. रिलीझनंतर हा चित्रपट आणि कलाकारांनी अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले होते. याशिवाय कॅटरिना आणि ऋतिकने ‘बँग-बँग’ चित्रपटातही एकत्र काम केले आहे.
- हेही नक्की वाचा-