Monday, June 17, 2024

‘कुछ कुछ होता है’मध्ये काजोलने का घातला होता हेअरबँड? अनेक वर्षानंतर करण जोहरने केला खुलासा

करण जोहरचा (Karan Johar) चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ हा बॉलिवूडच्या त्या आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे, जो आजही प्रेक्षकांना खूप आवडतो आणि हा चित्रपट आगामी काळातही आवडीचा राहील. या चित्रपटात कॉलेज जीवनातील प्रेम आणि मैत्रीचा मजेदार तडका लावला गेला आहे, ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड तोडले होते. इतकेच नाही, तर फॅशनच्या बाबतीतही या चित्रपटाने एक नवा ट्रेंड सेट केला, जो आजवर फॉलो केला जातो. 

या चित्रपटात शाहरुख खान (Shahrukh Khan) एका कुल डूडच्या भूमिकेत दिसला होता, जो गळ्यात चेन घालून मुलींना फ्रेंडशिप बँड बांधूत फिरत असे. दुसरीकडे, काजोलचा (Kajol) हेअरबँडही खूप लोकप्रिय झाला. अर्ध्या चित्रपटात काजोलने हेअरबँड लावला होता, पण प्रत्यक्षात हा हेअरबँड काजोलचा लूक पूर्ण करण्यासाठी लावला नव्हता तर काही वेगळ्याच कारणांमुळे लावला होता. याचा खुलासा करण जोहरने अनेक वर्षांनंतर केला आहे. (karan johar reveals kajol hairband was used to set his wig in film kuch kuch hota hai)

या वीकेंडला काजोल आणि करण जोहर रणवीर सिंगच्या शो ‘द बिग पिक्चर’मध्ये पोहोचले होते. यादरम्यान करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील काजोलच्या हेअरबँडशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगितला. करण जोहरने शोमध्ये सांगितले आहे की, केसांची समस्या दूर करण्यासाठी काजोलने हा हेअरबँड घातला होता.

करण जोहरने शोमध्ये खुलासा केला की, चित्रपटातील अंजली हेअरबँड घालत नव्हती. पण काजोलला तिच्या विगमध्ये समस्या होती, जी दूर होत नव्हती. विग फिक्स करण्यासाठी तिने हेअरबँड वापरला आणि या हेअरबँडने तिचा विग घट्ट ठेवला. मात्र हेअरबँडचा अचानक झालेला प्रयोग हा एक फॅशन ट्रेंड बनला आहे.

याशिवाय या शोचा एक प्रोमोही समोर आला होता, ज्यामध्ये करण जोहर त्याचे वडील यश जोहर यांचा व्हिडिओ पाहून भावूक होताना दिसत होता. करण जोहरने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटासाठी दिलेली टॅगलाइन ही त्याला मिळालेली सर्वात प्रेमाची भेट असल्याचे यश जोहर या व्हिडिओमध्ये सांगत आहे. वडील यशचे हे बोलणे ऐकून करण जोहर भावूक झाला. त्याचे डोळे ओले झाले होते.

या एपिसोडमध्ये करण जोहर आणि काजोल दोघांनी रणवीर सिंगसोबत खूप मजा केली. यादरम्यान काजोल आणि करण त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांमधील सीन रिक्रिएट करतात. गंमत म्हणजे रणवीर सिंगनेही काजोल आणि करणसोबत ‘बोले चुडियाँ’ आणि ‘ये लडकी है दिवानी’वर जबरदस्त डान्स केला.

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा