बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते राकेश रोशन यांनी अभिनयासोबत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. ‘कोई मिल गया’, ‘करण अर्जुन’, ‘क्रिश’ यांसारख्या अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे राकेश रोशन या दिवसात त्यांच्या डान्स स्टाईलमुळे ट्विटरवर ट्रेंड होत आहेत. त्यांचा मुलगा आणि सुपरस्टार ऋतिक रोशनसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते केवळ त्यांचे केवळ कौतुक करत नाहीत, तर त्यांना बेस्ट डान्सर असे देखील म्हणत आहेत.
ट्विटरवर राकेश रोशन यांचे मिम्स देखील व्हायरल झाले आहे. हे सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एक युजरने या बाप लेकाचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे आणि असे लिहिले आहे की, इंडियाचा बेस्ट डान्सर. परंतु सर्वांच्या मनात आता हाच प्रश्न येत आहे की, राकेश रोशन सारखे ज्येष्ठ कलाकार अचानक ट्विटरवर ट्रेंड कसे काय होत आहेत. याची सुरुवात इथून झाली की, एका युजरने राकेश रोशन यांना 1980 मधील बेस्ट डान्सर आहेत, असे म्हटले होते. त्यांनतर ट्विटरवर हे मिम्स बाहेर आले आहे.
https://twitter.com/PkDevote1/status/1392705245294301185
Rakesh Roshan India's Best Dancer ???????????????? pic.twitter.com/0l6VCjapw0
— Pavan ᴿᵃᵈʰᵉˢʰʸᵃᵐ ???? (@PavanSAAHO45) May 13, 2021
Rakesh Roshan drove us here ???? https://t.co/3aHaymdB8n
— ChaiBisket (@ChaiBisket) May 12, 2021
एका ट्विटर युजरने तेलुगु चित्रपटाबद्दल बोलताना दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी याला बेस्ट डान्सर म्हणण्यास नकार दिला होता. युजरने असे म्हटले होते की, 1980 च्या दशकात चिरंजीवीपेक्षा राकेश रोशन हे बेस्ट डान्सर आहेत.
यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, माफ करा पण राकेश रोशन बेस्ट डान्सर?? राकेश रोशन हे या स्टेप्स करू शकतात का? हिंदी चित्रपटात एक आघाडीचे नाव असणारे राकेश रोशन या दिवसात सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-