Saturday, April 19, 2025
Home अन्य पठाण चित्रपट पाहून हृतिक रोशन भारवला, पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘पूर्वी असं कधी…’

पठाण चित्रपट पाहून हृतिक रोशन भारवला, पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘पूर्वी असं कधी…’

शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाने  सर्व भारतीयांना वेड लावलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पठाणने बॉक्सऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. त्याशिवाय शाहरुख तब्बल 4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतल्याने चाहत्यांप्रती कमालिची उत्सुकता पाहायला मिळाली. भारतातील संपूर्ण थेट वातावरण पठाणमय झालं आहे. यामध्ये शाहरखचा हटके अंदाज पाहायाला मिळाल्याने अनेक कलाकार आणि दिग्दर्शक शाहरुखचं कौतुक करत आहेत. अशातच हृतिक रोशन याने पठाण पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिय व्यक्त केली आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशन (Hritik Rotion) याने नुकताच पठाण (Pathan) चित्रपट पाहिला आहे, त्याशिवाय त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याचं कौतुकही केलं आहे. स्वत: आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या हृतिकलाही शाहरुखच्या पठीणची भुरळ पडली आहे. तो खिल शाहरुखच अभिनय पाहुन हैरण झाला आहे.

हृतिकने पोस्ट शेअर करत लिहिले की, “काय ट्रिप. अतुलनीय दृष्टी, पूर्वी कधीही न पाहिलेले व्हिज्युअल, घट्ट पटकथा, अप्रतिम संगीत, आश्चर्य आणि सर्व प्रकारे ट्विस्ट. सिड तू पुन्हा ते केलंस, आदि तू दाखवलेल्या नावीन्याला आणि धाडसाला सलाम. दीपिका, जॉन आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. #पठान.” असं म्हणत त्याने पूर्ण टिमचं आणि शाहरुख खानच्या हिंमतीला दाद दिली आहे.

पठाण पित्रपटानिमित्ताने यशराज फिल्म प्रोडक्शने आजपर्यत अनेक गुप्तेहाराचे चित्रपट केले आहेत, त्यामध्ये हृतिक रोशन देखिल एक महत्वाचा भाग आहे. सलमान खानचा टायगर, हृतिकचा वॉर आणि शाहरुखचा पठाण तिन्ही चित्रपट एकाच स्पाय युनिव्हर्सचे भाग आहेत. त्यामुळे असेही म्हटले जात आहे की, सलमानच्या टायगर 3 मध्ये शाहरुख, सलमान सोबत हृतिकही दिसण्याची शक्यता दर्शवली जात आहे. त्यामुळे या तिन्ही स्टारर्सला एकत्र बघणं हे चाहत्यांसाठी बक्षिसच ठरेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पठाण’ने काश्मीरमध्ये केला ‘हा’ मोठा विक्रम, सिनेमाने मोडला ३२ वर्षांचा दुष्काळ
नीना गुप्ता यांच्या मुलीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर फोट शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा