Friday, April 19, 2024

PHOTO | अभिनेत्री ऋता दुर्गुळेने गुपचूप उरकलं शुभमंगल सावधान

सध्या लगीन सराई चालू आहे. अनेक मराठी तसेच हिंदी कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, महाराष्ट्राची क्रश असलेली ऋता दुर्गुळे (hruta durgule) हिने बुधवारी (१८ मे) रोजी कोणालाही कल्पना न देता लग्न केले आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिने काही फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी सगळ्यांना दिली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांना आनंदच सुखद धक्का बसला आहे. र तिच्या काही चाहत्यांना मात्र खूप वाईट वाटले आहे.

ऋताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नाचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहे. ऋता अगदी सिम्पल पण तेवढीच आकर्षक दिसत आहे. तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर लाला रंगाचा ब्लाऊज घातला आहे. नवरीच्या वेशात ती खूपच खुलून दिसत आहे. तसेच प्रतिकने देखील पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. दोघेही खूप सुंदर आहेत. हे फोटो शेअर करून ऋताने कॅप्शन दिले आहे की, “आतापासून ते शेवटपर्यंत.” त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. सगळेजण या फोटोवर कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

ऋताने काही महिन्यांपूर्वी तिच्या रिलेशनची अधिकृत घोषणा केली होती. त्यांनतर त्यांनी मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला होता. त्यावेळी सगळ्यांना तिच्या साखरपुड्याची माहिती होती. परंतु लग्न करताना मात्र तिने कोणालाही काहीही न सांगता लग्न उरकले. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये काहीशा प्रमाणात नाराजी आहे.

ऋता ही मराठी सिनेसिनेसृष्टीला एक आघाडीची नायिका आहे. सोशल मीडियावर तिचे मिलियनमध्ये फॅन फॉलोवर्स आहेत. सध्या ती ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे. याआधी तिची ‘फुलपाखरू’ ही मालिका देखील खूप गाजली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा