मागील एक-दीड महिन्यांपासून संपूर्ण मनोरंजन सृष्टीत एकच गोष्टीची चर्चा चालू आहे. ती म्हणजे ऋता दुर्गुळेचे रिलेशन आणि तिचे लग्न. ऋताने एक महिन्यापूर्वी ती रिलेशनमध्ये असल्याची अधिकृत माहिती दिली. ती हिंदी दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत मागील बरेच वर्ष रिलेशनमध्ये आहे. परंतु तिने या वर्षी त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून सगळ्यांना तिच्या रिलेशनबाबत माहिती दिली.
तसेच काही दिवसांपूर्वी तिने आणखी एक फोटो शेअर करून लवकरच काहीतरी खास असणार आहे अशी माहिती अप्रत्यक्ष पणे दिली. तिचे चाहते ती लग्न करणार आहे की, साखरपुडा याचा अंदाज लावत होते. अशातच ऋताचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. (Hruta durgule’s engagement photo and video viral on social media)
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ऋताने सुंदर असा लाँग व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे. तिने गळ्यात छोटासा डायमंड नेकलेस घातला आहे. तसेच प्रतीकने सूट घातला आहे ते दोघेही खूप सुंदर दिसत आहे. त्यांचा केलं कापताना देखील फोटो व्हायरल झाले आहेत. तसच त्यांनी साखरपुड्यात सुंदर डान्स देखील केला आहे.
त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचे चाहते अनेक दिवसापासून या क्षणाची वाट बघत होते. अखेर तो क्षण आला आहे आणि ऋताचा साखरपुडा झाला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत.
ऋता ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मोजक्याच मालिकांमध्ये काम केले आहे.परंतु तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तिने ‘दुर्वा’, ‘फुलपाखरू’ या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे.
हेही वाचा :
आवाजाच्या दुनियेतील जादूगारांनी केली बिग बॉसच्या घरात एन्ट्री, स्पर्धकांना दिले अवघड टास्क
उर्फी जावेदचा नवीन ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले, “कुत्रा मागे लागला होता की काय”
रोहमन शॉलपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन होती ‘या’ व्यक्तींच्या प्रेमात