उर्फी जावेदचा नवीन ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले, “कुत्रा मागे लागला होता की काय”


उर्फी जावेद सतत तिच्या अतरंगी फॅशनमुळे आणि तिच्या विचित्र लूकमुळे मीडियामध्ये चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या हटके कपड्यांमुळे सर्वच मीडियाचे आणि लोकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेत असते. उर्फीचे तिच्या विविध ड्रेसमधील फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे कपडे पाहून सर्वांनाच आश्चर्य देखील वाटते आणि हसायला देखील येते, कारण कधीच कोणी न घातलेले असे कपडे उर्फी नेहमीच घालताना दिसते. तिच्या फॅशन सेन्सवर नेटकरी नेहमीच हास्यास्पद कमेंट्स करताना दिसतात.

उर्फीचा सध्या एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आह. उर्फी जिथे जिथे जाते तिथे ती मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये घेरलेलीच असते. या नव्या व्हिडिओमध्ये उर्फी तिच्या गाडीतून उतरताना दिसते. लगेचच तिला फोटोग्राफर घेरतात. या व्हिडिओमध्ये उर्फीचा ड्रेस असा डिझाइन केला आहे, ज्यात तिचा ड्रेस जरा जास्तच फाटलेला दिसत आहे. इतकेच नाही तर तिचा ड्रेस फाटला तर आहेच मात्र त्याचे कपडे लटकलेले देखील दिसत आहे. तिचा हा निळ्या रंगाचा ड्रेस सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या ड्रेसवर तिने पोनी टेल बांधली असून, त्यावर मिनिमम मेकअप केला आहे.

तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. एकाने लिहिले ,”अरे देवा”, दुसऱ्याने लिहिले, “अधिक कपडे शिव ते नीट. एकाने लिहिले, “कोणत्या उंदराने कपडे कुर्तडले की, कुत्रा मागे लागला होता”, तर एकाने लिहिले, “हीच डिझायनर नक्की कोण आहे?” कोणी तिच्या अतिआत्मविश्वासावर देखील कमेंट केली आहे. अनेकांनी तिला टार्गेट करत तिच्या ड्रेसवर विचित्र आणि फनी कमेंट्स केल्या आहेत, तर काहींनी राग देखील व्यक्त केला आहे.

उर्फी ही करण जोहर सूत्रसंचालन केलेल्या बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती. याशिवाय तिने काही मालिकांमध्ये देखील काम केले. काही दिवसांपूर्वी उर्फीने तिला ट्रोल करणाऱ्या लोकांना उद्देशून एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात तिने, “खड्ड्यात गेले हे जग” अशा आशयाचा एक संदेश दिला होता.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!