महाराष्ट्राची क्रश अशी जिची ओळख आहे ती म्हणजे ऋता दुर्गुळे. ऋताने मोजक्याच मालिकांमध्ये काम केले आहे. परंतु तिच्या या मालिकांनी तिला एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिच्या ‘फुलपाखरू‘ या मालिकेने तर अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. खास करून तरुण वर्गाला तिने भुरळ घातली. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे लाखो फॅन फॉलोविंग आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने ती रिलेशनमध्ये असल्याची बातमी दिली. तिचे चाहते या बातमीने जरी खुश असले, तरी देखील त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले आहे. अशातच ऋताच्या सासरच्या मंडळींचा फोटो समोर आला आहे.
ऋता (Hruta) ही अभिनेता प्रतीक शाहसोबत रिलेशनमध्ये आहे. तिने त्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. अशातच एका कौटुंबिक कार्यक्रमात ऋता आणि प्रतीकचे कुटुंब एकत्र होते. यावेळी प्रतीकने त्याच्या कुटुंबासोबत फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्याची आई देखील दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे त्याची आई देखील मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Hruta durgule’s mother in low is also a famous actress)
ऋताच्या होणाऱ्या सासूबाईंचे नाव मुग्धा शाह हे आहे. त्यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम केला आहे. त्यांनी ‘खबरदार’, ‘बे दुणे साडे चार’, ‘मिस मॅच’, ‘गुनाह’, ‘कर्तव्य’, ‘पूछो मेरे दिल को’, ‘एनी टाइम मनी’ यांसारख्या अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. तसेच प्रतीक देखील दिग्दर्शक आहे. त्याने ‘बेहद २’ बहू बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘तेरी मेरी एक जिंदडी’ यांसाख्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
ऋता आणि प्रतीक शुक्रवारी (२५ डिसेंबर) रोजी साखरपुडा होणार आहे अशी चर्चा चालू होती. अशातच ऋताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला तिच्या मेहेंदीचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे आता ती साखरपुडा करणार आहे याची सगळ्यांना खात्री पटली आहे.
हेही वाचा :
व्वा! गायन-अभिनयानंतर आता केतकी दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत, चाहतेही झालेत उत्सुक
‘कह दू तुझे या चूप रहू’, इंद्राला करायचे आहे दिपूला प्रपोज, पण कसे?
लिव्ह इन रिलेशनशिपला लागली नजर! सुष्मिताने केले बॉयफ्रेंडला बेघर?