लिव्ह इन रिलेशनशिपला लागली नजर! सुष्मिताने केले बॉयफ्रेंडला बेघर?


बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. कधी ते आलिशान घर खरेदीमुळे, तर कधी महागड्या घटस्फोटामुळे चर्चेत येत असतात. त्यांच्या रिलेशनशिपच्याही चांगल्याच चर्चा रंगलेल्या असतात. अशीच एक अभिनेत्री आहे, जी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. ती म्हणजेच, सुष्मिता सेन होय. सुष्मिताच्या रिलेशनशिपबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी वाचल्यानंतर चाहत्यांचे मन तुटल्याशिवाय राहणार नाही. असे म्हटले जात आहे की, सुष्मिताचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले आहे.

सुष्मिता सेनचे (Sushmita Sen) तिचा १५ वर्षांनी लहान असलेला बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत (Rohman Shawl) ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे.

खरंच झालाय का सुष्मिता- रोहमनचा ब्रेकअप?
या जोडप्याशी जोडलेल्या एका सूत्राने माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुष्मिता आणि रोहमनचे ब्रेकअप झाले आहे. दोघांनीही आपले नाते संपवले आहे. इतकेच नाही, तर रोहमनने सुष्मिताचे घरही सोडल्याचे म्हटले जात आहे. तो सध्या आपल्या मित्राच्या घरी राहत आहे. या बातमीनंतर सुष्मिताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सुष्मिता आणि रोहमन बॉलिवूडच्या रोमँटिक जोडप्यांमध्ये गणले जातात. दोघांची जोडी आणि त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. नेहमीच सुष्मिता आणि रोहमन सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. तसेच रोमँटिक फोटो शेअर करतात. या जोडप्याच्या लग्नाबद्दलही चाहते प्रश्न विचारत असतात.

आता त्यांच्या लग्नाचे तर दूरच, पण त्यांचे रिलेशन संपल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या बातम्या खोट्या निघाव्या आणि या जोडप्याने पुन्हा एकत्र दिसावे असेच त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.

लग्नाच्या प्रश्नावर काय म्हणाला होता रोहमन?
मागील काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान, रोहमनला सुष्मिताशी लग्न करण्याचा प्रश्न विचारला होता. त्यावेळी तो म्हणाला होता की, “सुष्मिता, तिच्या मुली आम्ही आधीपासूनच एक कुटुंब आहोत. कधी मी मुलांसाठी एका वडिलांप्रमाणे असतो, तर कधी एका मित्राप्रमाणे. कधी-कधी आम्ही भांडतोही. आम्ही इतर सामान्य कुटुंबाप्रमाणेच आहोत. आम्हाला यामध्ये खूप मजा असते. आम्ही लग्न करू, तेव्हा लपवणार नाहीत.”

सुष्मिताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने एका दीर्घ काळानंतर पुनरागमन केले आहे. ती नुकतीच ‘आर्या २’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!