हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक नावीन्यपूर्ण आणि रंजक कथा असलेले चित्रपट भेटीला येत आहेत. यामध्ये अनेक चित्रपट हे दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक आहेत. आता अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खानसुद्धा (Saif Ali Khan) त्यांच्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात झळकणार आहेत. अशातच आता चित्रपटातील सैफचा पहिला लूक ऋतिकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेता ऋतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा बहुचर्चित ‘विक्रम वेधा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. आता चित्रपटातील अभिनेता सैफ अली खानचा पहिला लूक समोर आला आहे. या लूकमध्ये सैफ अली खान डोळ्याला गॉगल, पोलो टी शर्ट आणि जीन्समध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे. हा फोटो अभिनेता ऋतिक रोशनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यासोबतच ऋतिक रोशनने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल ही खुलासा केला आहे. हा फोटो शेअर करत ऋतिक रोशन म्हणतो की “विक्रम, एक उत्तम अभिनेता आणि सहकलाकार आहे. त्याच्या सोबत काम करणे खूपच आनंदाचे असते. मी जास्त काळ वाट पाहू शकत नाही.” याचबरोबर निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची ३० सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
‘विक्रम वेधा’ या बहुचर्चित चित्रपटात अभिनेता ऋतिक रोशन वेधाचा आणि सैफ अली खान विक्रमची भूमिका साकारत आहे. चित्रपटात ऋतिक रोशन खलनायक, तर सैफ अली खान नायक म्हणून काम करणार आहे. ऋतिक आणि सैफ पहिल्यांदाच अशा प्रकारच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट ‘विक्रम वेधा’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री करणार आहेत. हा चित्रपट ३० सप्टेंबरला सिनेमागृहात येऊन धडकणार आहे. चित्रपटात ऋतिक रोशन एका गँगस्टरची भूमिका करताना दिसणार आहे, तर अभिनेता सैफ अली खान पोलिस अधिकाराच्या भूमिकेत असणार आहे. त्याचबरोबर चित्रपटात राधिका आपटे आणि रोहित सराफ यांच्यासुद्धा प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट भारतीय लोककथा विक्रम आणि वेताळ यांच्यावर आधारित आहे. चित्रपटाचे निर्माते टी सिरीज आणि रिलायन्स इंटरटेनमेंट असणार आहेत.
दरम्यान चित्रपटात अभिनेता सैफ अली खान आणि ऋतिक रोशन यांच्या दमदार अभिनयाचा तडका पाहायला मिळणार आहे. दोघेही बर्याच काळानंतर पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. चित्रपटातील ऋतिक रोशनचा लूक याआधीच समोर आला आहे.
हेही वाचा –