बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटाव्यतिरिक्त ॲटिट्यूडसाठीही ओळखला जातो. त्याची फॅन फॉलोविंग आणि स्टारडम सर्वांनाच माहित आहे. त्याचबरोबर त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. तो कुठेही बाहेर फिरताना दिसला की, चाहते त्याच्याभोवती गर्दी करतात आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी जातात. चाहते इतके बेभान होतात की, जबरदस्तीने फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सलमान देखील त्यांना धडा शिकवण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. काही दिवसांपूर्वी याच कारणामुळे सलमान खानने एका चाहत्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये सलमान पॅपराजींसाठी पोझ देताना दिसत आहे. तेवढ्यात एक चाहता मध्यभागी येतो आणि सलमानसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. यावर सलमान म्हणतो की, समोरून फोटो क्लिक होतोय, पण फॅन मात्र त्याच्याच नादात मग्न राहतो. यावर चिडून सलमान म्हणतो की, “तो फोटो घेतोय ना, नाचणे बंद कर ना भाऊ.”
सलमानचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सलमानच्या या प्रतिक्रियेचे चाहतेही खूप कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “यावेळी भाईजानने फोन घेतला नाही हे चांगले आहे.” दुसर्याने लिहिले की, “सलमान भाई मनात विचार करत असतील, तू मला फुटपाथवर भेट.” आणखी एका युजरने लिहिले की, “भाऊ, इतके अहंकारी असणे चांगले नाही.”
या व्हिडिओमध्ये सलमान पांढऱ्या टी-शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये दिसत आहे. याआधीही सलमानने अनेकवेळा चाहत्यांची शाळा घेतली आहे. असे असूनही सलमानच्या फॅन फॉलोविंगमध्ये कोणतीही कमतरता झालेली नाही. सलमानची लोकप्रियता एवढी आहे की, चित्रपट कसाही असला, तरीही विक्रम नक्की करतोच.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सध्या सलमान खान ‘बिग बॉस १५’ हा शो होस्ट करत आहे आणि २६ नोव्हेंबरला तो ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला, जो सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला होता. या चित्रपटात तो पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ’अंतिम’मध्ये सलमान खानव्यतिरिक्त आयुष शर्मा देखील आहे. तसेच, सलमान पुन्हा एकदा ‘टायगर ३’ च्या तिसऱ्या सीरिजमध्ये कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. त्याचवेळी सलमान ‘भाईजान’मध्येही आहे, ज्याचे पूर्वीचे नाव ‘कभी ईद कभी दिवाली’ होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल