राहुल देव बर्मन म्हणजेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय असे पंचमदा. पंचमदा यांची आज २७ वी पुण्यतिथी. २७ जून १९३९ ला कोलकातामध्ये आर,डी. बर्मन यांचा जन्म झाला होता.
पंचमदा यांचे वडील सचिन देव बर्मन हे हिंदील चित्रपटसृष्टीतील मोठे संगीतकार होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत पंचमदा यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. पंचमदा यांनी १९६१ ते १९९४ या काळात सुमारे ३३१ चित्रपटांना संगीत दिले. सोबत काही चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी देखील गायली.
पंचमदा यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले. पंचमदा यांनी त्यांच्या संगीताने, गाण्याने सुमारे ३३ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पंचमदा यांची जीवन संगीताने व्यापलेले होते. असे असले तरी त्यांच्या वैयक्तिक जीवनात लग्नामुळे त्यांना खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
पंचमदा यांनी आशा भोंसले यांच्यासोबत १९८० मध्ये लग्न केले. मात्र यांचे लग्न इतक्या सहजतेने झाले नाही, त्यांना या नात्याला त्यांच्या आईने खूप विरोध केला. असे म्हणतात की, पंचमदा यांच्या आईने आशा भोंसले यांच्याशी लग्न करण्यावरून त्यांना सांगितले होते ‘मी जिवंत असे पर्यंत हे लग्न होऊ देणार नाही. तुम्हाला लग्न करायचे असेल तर मी मेल्यावर माझ्या प्रेतासमोर करा.’ असे ठासून सांगितले होते.
तरीही यादोघांनी हार न मानता प्रयत्न केले आणि शेवटी त्यांचे लग्न पंचमदा यांच्या आई जिवंत असतानाच झाले.
आशा भोसले आणि पंचमदा यांची पहिली भेट १९५६ साली झाली. तेव्हा आशा या मोठ्या गायिका बनल्या होत्या तर पंचमदा स्ट्रगल करत होते. त्यानंतर १० वर्षांनी पंचमदा यांनी ‘तिसरी मंजिल’ चित्रपटासाठी आशा भोसले यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर अनेक वेळा कामासाठी त्यांच्या भेटी झाल्या. आशा यांनी पंचम दा यांच्यासाठी अनेक चित्रपटात गाणी गेली. त्यावेळी दोघांचेही पहिले लग्न तुटले होते. जरी दोघांनी मोकळेपणाने त्याच्या एकमेकांबद्दल असणाऱ्या भावना व्यक्त केल्या नसल्या तरी गाण्यातून ते नेहमीच एकमेकांना त्याच्या भावना सांगायचे.
आरडी यांचे पहिले लग्न रिता पटेल यांच्यासोबत १६६६ साली झाले होते. रिटा ही आरडी यांची मोठी फॅन होती. त्यांच्यात हळूहळू मैत्री आणि नंतर प्रेम असे टप्पे पार केल्यावर आरडी आणि रिता यांनी लग्न केले. मात्र, त्यांचे लग्न फक्त पाच वर्षच टिकले. त्यानंतर ते वेगळे झालं.
इकडे आशा भोसले यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच घरच्यांच्या विरोधात ३१ वर्ष वय असणाऱ्या गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. पण त्यांचेही लग्न जास्त काळ टिकले नाही लग्नानंतर काहीच वर्षात आशा त्यांच्या तीन मुलांना घेऊन माहेरी आल्या.
आरडी आणि असा दोघेही त्यावेळी साथीदाराच्या शोधात होते. त्यांना एकमेकांमध्येच त्यांचा जोडीदार सापडला आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले. मात्र, आरडी यांच्या आई मीराबाई यांना हे लग्न बिलकुल मान्य नव्हते. आपल्या मुलापेक्षा मोठ्या असणाऱ्या आशा त्यांना त्यांच्या सून म्हणून नको होत्या.
मीराबाई यांनी पंचमदा यांना सांगितले की, ‘मी जिवंत असे पर्यंत हे लग्न होऊ देणार नाही, मी मेल्यानंतर तुम्ही खुशाल लग्न करा.’ हे ऐकून पंचम निघून गेले. काही दिवसांनी आरडी यांच्या वडिलांचे सचिनदेव बर्मन यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाचा धक्का मीराबाई यांना सहन झाला नाही, आणि त्या मानसिक रोगी झाल्या. त्या हळूहळू सर्व गोष्टींची विस्मृती होऊ लागली. त्या त्यांच्या मुलाला आरडी यांना देखील विसरल्या. त्यावेळी पंचम यांना समजले की आईची तब्येत आता अशीच राहील, तेव्हा त्यांनी १९८० साली आशा भोसले यांच्यासोबत लग्न केले.
आशा आणि पंचम यांचा संसार सुखाचा चालू असताना ४ जानेवारी १९९४ ला पंचमदा यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी जगाचा निरोप घेता. आशा भोसले आणि पंचम दा यांनी १४ वर्ष संसार केला. मात्र, या दोघांची साथ नियतीमुळे कायमचीच तुटली.