Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून हुमा कुरेशी झाली तूफान हिट; ‘या’ जाहिरातने बदलून टाकले होते तिचे अवघे जीवन

अभिनयात करियर करण्यासाठी अनेक लोकं मुंबई गाठतात. इथे येऊन काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करतात. काही अर्ध्यावरच त्यांचे स्वप्न गुंडाळून घराची वाट धरतात तर, काही त्यांच्या चिकाटीने, मेहनतीने काम मिळवतातच. स्वप्ननगरी नाव असलेली मुंबई सर्वांचीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करते, मात्र या शहरात टिकण्यासाठी लोकांना अतिशय संयम ठेवावा लागतो. जवळपास या इंडस्ट्रीमधील सर्वच कलाकारांनी अभिनयात येण्याआधी मुंबईमध्ये येउन संघर्ष केला आहे. याला अभिनेत्री हुमा कुरेशी देखील अपवाद नाही. आज हुमा तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.

हुमा कुरेशीचा जन्म 28 जुलै 1986ला दिल्लीमध्ये झाला. हुमाचे वडील हे दिल्लीमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आहे. ते दिल्लीमधील प्रसिद्ध हॉटेल चेन असलेल्या सलीम्सचे मालिक आहे. हुमाने तिचे शिक्षण दिल्लीमधून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होत असतानाच हुमाने अभिनयात करियर करण्याचे ठरवले. त्यामुळे ती 2008 साली मुंबईत अभिनयात करियर करण्यासाठी आली. (huma qureshi birthday know unknown facts about her)

त्यानंतर तिचा ऑडिशन्स देण्याचा सिलसिला सुरु झाला. मात्र अनेक दिवस ऑडिशन देऊनही तिला काम मिळत नव्हते. अखेर एका ऑडिशननंतर हुमाची हिन्दुस्तान यूनीलिवरसाठी निवड करण्यात आली. या कंपनीसोबतच्या करारानंतर हुमाला अनेक जाहिरातींमध्ये काम मिळाले. जाहिराती करत असतानाच हुमा कुरेशीला आमिर खानसोबत एका मोबाईल फोनच्या जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या जाहिरातीनंतर हुमाला किंग खान म्हणजेच शाहरुख खानसोबत देखील जाहिरात करण्याची संधी मिळाली.

हुमा कुरेशी आणि आमिर खानची मोबाईलची जाहिराची पाहिल्यावर, दिग्दर्शक अनुराग कश्यपची नजर हुमावर पडली. तेव्हा अनुराग कश्यपने हुमाला त्याच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमासाठी कास्ट केले. या सिनेमात हुमाने नवाजुनद्दिनच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. या सिनेमात तिची भूमिका मोठी नसली तरी महत्वाची होती. पहिल्याच सिनेमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची छाप सोडली.

एका सिनेमाने तिला मिळालेली लोकप्रियता आणि तिचा प्रभावी अभिनय पाहून अनुराग कश्यपने तिला ‘गँग्स ऑफ वासेपूर 2’ मध्ये पुन्हा संधी दिली. यानंतर हुमाने कधीच मागे वळून पाहिले नाही. या सिनेमानंतर हुमा ‘इश्किया’, ‘बदलापुर’, ‘जॉली एलएलबी 2′, ’काला’ या सिनेमांमध्ये झळकली. यासोबतच तिने अनेक पुरस्कारही जिंकले. हिंदीसोबत हुमाने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले.

हुमाच्या संपत्तीबद्दल सांगायचे झाले, तर एका रिपोर्टनुसार तिच्याकडे 22 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. ती एका सिनेमाचे 2/3 कोटी रुपये घेते. शिवाय तिच्याकडे SUV Land Rover Freelander, Mercedes Benz अशा महागड्या गाड्या देखील आहे.

अधिक वाचा- 
कधीकाळी नाना पाटेकरांसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री आयशा जुल्का, सध्या करते ‘हे’ काम
हुमा कुरेशीला ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी मिळाले केवळ ‘इतके’ पैसे, जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

हे देखील वाचा