Tuesday, September 26, 2023

हुमा कुरेशीला ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी मिळाले केवळ ‘इतके’ पैसे, जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

हुमा कुरेशी सध्या तिच्या ‘तरला‘ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. अशात नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, तिने ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल खुलासा केला.  हुमाने तिच्या चित्रपट पदार्पणाबद्दल आणि त्यानंतर आलेल्या आव्हानांबद्दल सांगितले. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

हुमाने (huma qureshi) एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “2010 मध्ये मी मुंबईला गेले आणि 2012 मध्ये ‘गॅंग्स ऑफ वासेपू’र हा चित्रपट रिलीज झाला आणि भारतात खूप हिट ठरला. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी मला सुमारे 75,000 रुपये दिले. मी आता त्यांच्यासोबत (व्हायकॉम 18)मध्ये काम करत आहे. ते माझे निर्माते आहेत, पण तो माझा पहिला चित्रपट होता आणि तो काही फॅन्सी अफेअर नव्हता. फाईव्ह स्टार हॉटेल्स, व्हॅनिटी व्हॅनची जागा किंवा लोकांची फौज नव्हती. हा अशा लाेकांचा समूह हाेता, जे तीन महिण्यासाठी वाराणसीला गेले शूटिंग केली आणि वापस आलेत. काेणालाच कल्पना नव्हते की, काय हाेत आहे. बाहेर आल्यावर मी म्हणाली, ‘व्वा! मी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे का? होर्डिंगवर माझा चेहरा आहे का? यासाठी मला जास्त पैसे मिळायला हवे होते का? चित्रपट असे बनतात का?”

हुमा कुरेशी म्हणाली की, “गँग्स ऑफ वासेपूर हा एक खास अनुभव आणि हा एक असा चित्रपट होता, ज्याने माझे आयुष्य खरोखरच बदलून टाकले. कारण, जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि खूप हिट झाला, तेव्हा मला काय होत आहे हे माहित नव्हते.” अभिनेत्री पुढे म्हणाली, “मुंबईत येणं, लोकांना भेटणं, ऑडिशन्स देणं, चित्रपट करणं हे खूप लवकर झालं होतं आणि त्यानंतर माझ्याकडे गेम प्लॅन नव्हता. मी नेहमी काम करत होते. तो काही प्रॉब्लेम नव्हता, पण मी स्वतःमध्येच हरवले होते. जसे की, माझा स्वतःचा आवाज शोधणे, मी कोण आहे हे शोधणे, मला कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतात, मला काय करायला आवडत नाही या सर्व गाेष्टी.”

हुमा म्हणाली, “मी प्रत्येक गोष्टीबद्दल असुरक्षित होते. इतर करत असलेले चित्रपट मी का करत नाही याबद्दल कदाचित असुरक्षित असेल. माझ्याशी बोलायला कुणीच नव्हतं. चित्रपटसृष्टीत माझा एक धाकटा भाऊ होता, जो त्याचा मार्ग शोधत होता. रडायला एक खांदा होता, पण त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी खरोखर मदत करणारे कोणीच नव्हते. मात्र, मी कधीच हार मानण्याचा विचार केला नाही.” विशेष म्हणजे हुमा कुरेशी सध्या ZEE5 च्या ‘तरला’ मध्ये दिसत आहे. या चित्रपटात तिने प्रसिद्ध शेफ तरला दलाल यांची भूमिका साकारली आहे.(bollywood actress huma qureshi revealed she was paid 75 thousand for gangs of wasseypur)

अधिक वाचा-
बापाला आणखी काय हवं? मराठी अभिनेत्याची लेक झाली पायलट पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद
चंदन तस्करी, शेकडो लोकांचे बळी; अंगावर काटा आणणारा ‘वीरप्पन’चा ट्रेलर रिलीज

हे देखील वाचा