बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या चित्रपटांमधील दमदार अभिनयामुळे तसेच तिच्या स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे कायमच चर्चेत असते. एकीकडे, तापसी एकामागून एक सुंदर फोटोंद्वारे चाहत्यांना तिच्या आयुष्याची झलक दाखवताना दिसते. तर दुसरीकडे, ती अनेकदा फोटो काढण्यासाठी आलेल्या पापाराझींसोबत वादविवाद करताना दिसते. ज्यामुळे तिला खूप ट्रोल केले जाते. आता तापसीने या मुद्द्यावर आपले मौन सोडले असून ती याबाबत आपली बाजू स्पष्ट करताना दिसत आहे.
अलीकडील एका मुलाखतीत, तापसी पन्नूने प्रचंड ट्रोलिंग आणि पापाराझीच्या युगात पब्लिक फिगर असण्याच्या आव्हानात्मक पैलूवर प्रकाश टाकला. ऑनलाइन टीकेवर बोलताना, तापसीने कबूल केले की, ‘मला वाटते की मी याप्रकारचे जीवन निवडले आहे ज्यात तुम्ही काही केले किंवा नाही, तुम्हाला ट्रोल केले जाईलच.आणि दुर्दैवाने हे मला खूप उशिरा कळले
तापसी पन्नू पुढे म्हणाली, ‘ मला वाटते की हे ट्रोलिंग अलीकडेच आपल्या सर्वांच्या आयुष्यात आले आहे. हे लोक नकारात्मकतेत तुमचा वेळ वाया घालवत आहेत.तापसीचा असा विश्वास आहे की आजच्या ट्रोल्स मध्ये कठोरता असली तरीही, त्यांच्यात पूर्वीच्या काळाइतकी एखाद्याची कारकीर्द नष्ट करण्याची शक्ती नाही. तापसी म्हणाली की हे लोक आमचे करिअर संपवू शकत नाहीत अन्यथा मी इथे नसते. पापाराझींसोबत वेळोवेळी होणाऱ्या वादावरही तापसीने मौन सोडले.
तापसी पन्नू म्हणाली, ‘मी सार्वजनिक मालमत्ता नाही, सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आहे. या वस्तुस्थितीसाठी माझा हा युक्तिवाद स्पष्ट आहे. दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. तिने खाजगी बाबतीत तिचा हक्क ठामपणे मांडला आणि छायाचित्रकार मर्यादा ओलांडत असल्याचे हायलाइट केले. तापसी म्हणाली, ‘ हे लोक माझ्यावर ओरडले तर मला ते सहन होणार नाही. किंवा जर त्यांनी माझ्यावर झेप घेतली आणि शारीरिकदृष्ट्या माझ्या खूप जवळ आला तर तेही मला मान्य असणार नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
अक्षयच्या मदतीला धाऊन आला सिद्धार्थ आनंद ! ॲक्शन चित्रपटातून करणार पुनरागमन ?










