Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अफेअरच्या चर्चेदम्यान इब्रहिम अली खान अन् पलक तिवारीचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

सैफ अली खानचा लाडला लेक इब्राहिम अली खान अभिनेत्री पलक तिवारीला डेट करत असल्याच्या अफवा आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. अशात करण मेहताने बुधवारी (दि. 22 जुन)ला रात्री त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे सेलिब्रेशन ठेवले होते. या पार्टीत सहभागी होण्यासाठी दोघेही एकत्र पोहोचले, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत असून चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

करण मेहताच्या वाढदिवसाच्या पार्टीत पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान एकत्र आल्याने त्याच्या अफेअरच्या बातम्या पुन्हा एकदा चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यादरम्यान इब्राहिम अली खान ब्लॅक शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये खूपच सुंदर दिसत होता, तर पलकही ब्लॅक वन पीसमध्ये तिच्या हॉटनेसने सर्वांचे लक्ष वेधत आहे. मात्र, यादरम्यान दोघांनीही पॅपराझींसमाेर एकत्र पोझ दिली नाही.

दोघांचा एकत्र पार्टीत पोहोचल्याचा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साेशल मीडिया युजर्स इब्राहिम आणि पलक यांच्यावर भन्नाट कमेंट करून ते रिलेशनशिपमध्ये आहेत का? असा प्रश्न करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘कुछ भी कहो जोडी मस्त है पर..’, तर दुसऱ्याने कमेंट केली, ‘दोघेही खूप क्यूट दिसत आहेत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

इब्राहिम अली खानच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ताे लवकरच बोमन इराणी यांचा मुलगा कोयोज इराणीच्या ‘सरजमीन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इब्राहिम त्याचे वडिल सैफ अली खानची कार्बन कॉपी दिसतो, अशा परिस्थितीत इब्राहिमचीही चांगली फॅन फॉलोइंग आहे. दुसरीकडे, पलक तिवारीबद्दल सांगायचे तर, तिने यावर्षी सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.( Ibrahim ali khan and actress palak tiwari reachedt he karan mehta birthday party together people said jodi mast hai )

अधिक वाचा –
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
अवनीत काैरचा हॉट अंदाज चाहत्यांना लावतोय वेड, तुम्ही पाहिला का?

हे देखील वाचा