Monday, July 1, 2024

‘टायगर 3’ रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाचा बोलबाला, ऍडव्हान्स बुकिंगने केला 12 कोटींचा पल्ला पार

सलमान खान (salman khan) आणि कतरिना कैफचा स्पाय थ्रिलर चित्रपट ‘टायगर 3’ या दिवाळीत 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून, ‘टायगर 3’ दिवाळीत रेकॉर्ड बनवण्यासाठी सज्ज झाल्याचे त्याच्या कलेक्शनवरून दिसून येते. चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 12 कोटींहून अधिक कमाई केली आहे

वृत्तानुसार ‘टायगर 3’ ने रिलीजच्‍या पहिल्याच दिवशी 46 लाख 2 हजार 327 तिकिटे विकली आहेत. यासह चित्रपटाने 12.43 कोटींची कमाई केली आहे. ‘टायगर 3’ साठी हा सकारात्मक प्रतिसाद आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अजून २ दिवस बाकी असून त्यात हा आकडा वाढू शकतो.

अलीकडेच ‘टायगर 3’ रिलीज होण्यापूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचा रनटाइम वाढवून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. यापूर्वी चित्रपटाचा रनटाइम 2 तास, 33 मिनिटे, 38 सेकंद होता, आता अतिरिक्त रनटाइमसह तो 2 तास, 36 मिनिटे, 00 सेकंद झाला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली.

‘टायगर 3’ हा यश चोप्रा फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला आणि मनीष शर्मा दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांचा खास कॅमिओ दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘ती माझी सर्वात मोठी चूक’, मनोज मुंतशीर याने ‘आदिपुरुष’बाबत केले मोठे विधान
अनुपम खेर यांनी पूर्ण केले ‘विजय 69’चे शूटिंग, टीमसोबत केक कापून साजरा केला आनंद

हे देखील वाचा