Tuesday, March 5, 2024

‘इरफानला 5 वर्षां केले डेट, गंभीर करायचा मिस कॉल …’, शमीला प्रपोज करणाऱ्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

विश्वचषक 2023च्या सामन्यांदरम्यान टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला जाहीरपणे लग्नाचा प्रस्ताव देऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री पायल घोष. पायल हिने शुक्रवारी सकाळी एकापाठोपाठ एक ट्विट करून क्रिकेटपासून बॉलिवूड जगतात खळबळ उडवून दिली आहे. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

पायल घोषने तिच्या ट्विटमध्ये भारताचा दिग्गज खेळाडू इरफान पठाण याचे बॉयफ्रेंड म्हणून वर्णन केले आहे आणि म्हटले आहे की, ‘तिचे आणि इरफान पठाणचे अफेअर सुमारे पाच वर्षे चालले आणि त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला.’ शमीशी लग्न करण्याबाबतचे ट्विट आपण गमतीने केल्याचे तिने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

एका यूजरला रिप्लाय देताना तिने लिहिले की, “अरे भाऊ, मी गमतीने ट्विट केले होते. मला कोणत्याही शमी-वामीशी लग्न करायचे नाही, मला सामान्य मुलगा पसंत असेल, तोही एक निष्ठावंत असावा.” यानंतर तिने पुढचे ट्विट केले, ज्यामध्ये तिने लिहिले की, ‘गौतम गंभीर आणि अक्षय कुमार हे सगळे माझ्या मागे लागले होते, पण मला फक्त इरफान पठाण आवडत होता. मला त्याच्याशिवाय दुसरे कोणी दिसले नाही आणि मी इरफानला सर्व गोष्टी सांगायचे.

 “पण आणखी एक गोष्ट आहे, अनुराग कश्यपने माझ्यावर बलात्कार केला होता, पण अक्षय कुमारने माझ्यासोबत कधीही अश्लीलता केली नाही, तो इतका मोठा स्टार आहे, मी त्याचा नेहमीच आदर करेन.” असेही तिने ट्विट करत म्हटले आहे.

पायल घोष इथेच थांबली नाही, तिने पुढे लिहिले की, “गौतम गंभीर मला सतत मिसकॉल द्यायचा आणि इरफान पठाणला हे चांगलेच माहीत आहे. तो माझा प्रत्येक कॉल चेक करत असे. मी इरफानला भेटायला पुण्याला गेले होते तेव्हा त्याने युसूफ भाई, हार्दिक-कुणाल पंड्या यांनाही हे सांगितले होते, त्या वेळी बडोद्याला मॅच सुरू होत्या.” पायल घोषचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. (Sensational disclosure of actress Payal Ghosh who proposed to Shami)

आधिक वाचा-
श्रीदेवी यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर? बोनी कपूर यांनी दाखवला रेड सिग्नल, म्हणाले…
‘या सगळ्यांसमोर मी आपली इवलुशी, पण…’, ‘झिम्मा 2’फेम अभिनेत्रीच्या पोस्टने वेधल लक्ष

हे देखील वाचा