Monday, March 9, 2026
Home बॉलीवूड इलियानाने आराम करत असलेला फोटो शेअर करत स्वतःवर प्रेम करण्याचा दिला सल्ला, मात्र नेटकाऱ्यानी केले ट्रोल

इलियानाने आराम करत असलेला फोटो शेअर करत स्वतःवर प्रेम करण्याचा दिला सल्ला, मात्र नेटकाऱ्यानी केले ट्रोल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकदा इलियाना तिच्या अकाऊंटवर तिचे अनेक सेल्फी देखील पोस्ट करत असते. नुकताच तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या चाहत्यांनी तिला सल्ला दिला आहे.

तिच्या नवीन सेल्फीमध्ये इलियाना बेडवर आराम करताना दिसत आहे. तिच्या या फोटोला ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर तिच्या चाहत्यांनी या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. सेल्फी शेअर करताना तिने लिहिले की, “स्वतःवर प्रेम करण्याचा दिवस, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला मिठी मारा आणि आपले शरीर स्वर्ग आहे, ते प्रत्येक कठीण संकटांमध्ये साथ देतं, त्यासाठी आपल्या शरीराचे आभार माना. आपण स्वतः एक लढाई करण्याचे मशीन आहोत, तर आज बसा आणि त्या अद्भुत गोष्टींचा आनंद घ्या.”

इलियानाच्या या सेल्फीवर एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली की, “संध्याकाळ होणार आहे, उठ आता…” दुसऱ्याने लिहिले की, “मी एकटी आहे आणि उदास आहे.” इलियानाच्या या सेल्फीवर १७०० हून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही चाहते तिच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तर काही चाहते तिला ट्रोल करत आहे.

इलियाना तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. तिने यापूर्वी एक बिकिनी फोटो शेअर केला होता. ज्यावर चाहते म्हणाले होते की, आग लावली आहे. इलियाना विविध रंगांच्या बिकिनीमध्ये सनबाथ घेताना दिसली होती. तिने २०१२ मध्ये ‘बर्फी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अलीकडेच इलियाना डिक्रूजचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यापूर्वी इलियाना डिक्रूझ ‘पागलपंती’मध्ये दिसली होती. ३३ वर्षीय इलियाना डिक्रूझ बॉलिवूड आणि साऊथ दोन्ही चित्रपटांमध्ये काम करते. इलियानाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका तेलगू चित्रपटातून केली. तिचा आगामी चित्रपट ‘तेरा क्या होगा लवली’ आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा देखील आहे

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

हे देखील वाचा