तब्बल ४८ कोटीहून अधिक लोकांनी पाहिलाय १८ सेकंदाचा हा व्हिडिओ, काय आहे खास? तुम्हीच पाहा


सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जिथे कोणतीही गोष्ट क्षणार्धात व्हायरल होत असते. काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही मात्र काळजाचा थरकाप उडवणारी असतात. काही व्हिडिओ हे संदेश देणारे असतात, तर काहीवेळा हे व्हिडिओ चकित करणारेही असतात. सोशल मीडिया युजर असे व्हिडिओ भरभरून शेअर करतात, ज्यामुळे हे व्हिडिओ किंवा फोटो अनेक लोकांपर्यंत पोहचतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे, ज्याने अवघ्या सोशल मीडियाच्या भुवया उंचावल्या आहेत.

हा व्हिडिओ एका बीचवरील आहे, जिथे काही लोक वेळ घालवण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी आलेले दिसत आहेत. यात तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती खुर्चीवर बसून पुस्तक वाचत आहे. तो पुस्तक वाचण्यात इतका मग्न झालेला आहे, की दुसरा व्यक्ती मागून त्याची खुर्ची बाजूला काढतो तरीही त्याला काही समजत नाही. नवल वाटण्याची बाब म्हणजे, खाली खुर्ची नसूनही तो व्यक्ती अतिशय सामान्य पद्धतीत बसलेला दिसत आहे. होय! यात तुम्ही पाहू शकता की, खुर्चीवर बसलेला नसूनही त्या व्यक्तीने अतिशय उत्तम संतुलन राखले आहे. (impossible balance on beach viral video)

मात्र तिथे उपस्थित एक महिला हे बघून आश्चर्यचकित होते. ती म्हणते की, हे कसं काय शक्य आहे! ती त्या व्यक्तीला म्हणते की, “तुझी खुर्ची?” यावर तो म्हणतो की, “काय झालं?” खुर्ची काढलेल्या व्यक्तीकडे खुणावत ती म्हणते, “ती तुझी खुर्ची आहे.” तो खाली बघतो, तेव्हा त्याला त्याची खुर्ची दिसत नाही. विशेष म्हणजे, आपण खुर्चीवर बसलेलो नाहीत, हे समजल्यावर त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. आता कमेंटमध्ये युजर्सकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे की, हे कसं काय होऊ शकतं?

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!