Salaar | प्रभासच्या चाहत्याने निर्मात्यांना दिली मरण्याची धमकी, थेट सुसाईड नोट लिहित म्हणाला…

भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘बाहुबली’ प्रभासकडे (Prabhas) सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत, ज्यामुळे अभिनेता प्रसिद्धीच्या झोतात आहे. प्रभास लवकरच ‘सालार’ या चित्रपटातही दिसणार असून, या चित्रपटात अभिनेत्याचा लूक खूपच दमदार असणार आहे. पण बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाशी संबंधित कोणतेही अपडेट समोर आले नाही आणि त्यामुळे प्रभासचे चाहते संतापले आहेत. प्रभासच्या एका क्रेझी फॅनने तर थेट चित्रपटाच्या निर्मात्यांना सुसाईड नोट लिहिली आहे. या चाहत्याने निर्मात्यांना चित्रपटाशी संबंधित अपडेट मागितले आहे आणि त्यांनी तसे न केल्यास जीव देण्याची धमकीही दिली आहे.

प्रभासच्या चाहत्याची ही नोट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चिठ्ठीत लिहिले आहे की, “दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सांगितले होते की, ते लवकरच ‘सालार’बद्दल अपडेट देतील. मात्र याला महिनाभराहून अधिक काळ लोटला. त्यांनी अद्याप कोणतेही अपडेट दिलेले नाही. या महिन्यात मला ‘सालार’कडून अपडेट मिळाले नाही, तर मी आत्महत्या करेन. मी खूप निराश आणि दु:खी आहे कारण ‘साहो’ आणि ‘राधेश्याम’च्या काळातही असेच घडले होते. मला फक्त ‘सालार’चे अपडेट हवे आहेत. (prabhas fan threatened the makers of saalar wrote suicide note)

मात्र, प्रभासच्या चाहत्याने असा पराक्रम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘राधे श्याम’ चित्रपट रिलीझ होण्यापूर्वीही असा प्रकार घडला होता. चित्रपटाशी संबंधित अपडेट्स न मिळाल्याने एका चाहत्याने निर्मात्यांच्या नावे सुसाईड नोट लिहिली होती. चिठ्ठीत त्या व्यक्तीने त्याच्या मृत्यूसाठी निर्मात्यांना जबाबदार धरले होते. मात्र, सुसाइड नोट लिहिणाऱ्या चाहत्याने आत्महत्या केलेली नाही.

‘सालार’बद्दल बोलायचे झाले, तर हा एक ऍक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभास जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार आहे. यात प्रभाससोबत श्रुती हासन (Shruti Haasan), दिशा पटानी (Disha Patani), जगपती बाबू (Jagpati Babu) यांसारखे स्टार्स दिसणार आहेत. हा चित्रपट २०२२ पर्यंत पूर्ण होईल असे मानले जात आहे. तसेच हा चित्रपट २०२३ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post