Monday, July 1, 2024

खलनायकी साकारूनही मिळवलीय प्रेक्षकांची वाहवा! तर ‘या’ आहेत बॉलिवूडच्या टॉप ६ ‘लेडी व्हिलन’

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींमध्ये कामाच्या बाबतीत स्पर्धा पाहायला मिळते. अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर अनेकदा असेही दिसून येते की, अभिनेत्रींपेक्षा अभिनेते अधिकदा खलनायकाची भूमिका साकारताना दिसतात. पण अशा काही टॉप ६ अभिनेत्री आहेत, ज्यांनी खलनायिकेची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे त्यांना प्रेक्षकांकडून बरीच वाहवा देखील मिळाली आहे. या अभिनेत्रींनी नायिकेची भूमिका तर उत्तम साकारली आहेच, पण खलनायिका म्हणून ही त्या अव्वल स्थानी आहेत. आज आपण पाहूयात, या ६ अभिनेत्री कोण आहेत, ज्यांना बॉलिवूड चित्रपटांमधील खलनायिका म्हणून देखील चांगलीच पसंती मिळाली आहे.

काजोल
अभिनेत्री काजोलला आपण नेहमीच निरागस आणि आकर्षक स्वरूपात अभिनय करताना पाहिले आहे. पण तिने बॉलिवूड चित्रपटात खलनायिकेची भूमिकाही साकारली आहे. ‘गुप्त: द हिडन ट्रुथ’ हा चित्रपट साल १९९७ मध्ये आला होता. या चित्रपटात काजोलला बऱ्याच हत्या करताना दाखवले आहे. बॉबी देओलने या चित्रपटात नायक साहिलची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात बॉबी देओलवर खोटा आरोप केला जातो की, त्याने त्याच्या सावत्र वडिलांची हत्या केली आहे. त्याचबरोबर दोषी ठरल्यानंतर तो तुरुंगातून पळून जातो. त्यानंतर तो त्याच्या वडिलांच्या मारेकऱ्याच्या शोधात आहे, असे दाखवले आहे. चित्रपटाच्या शेवटी हे उघड झाले आहे की, या घटनेची गुन्हेगार ईशा म्हणजेच काजोल होती. तिनेच साहिलच्या सावत्र वडिलांची हत्या केली, जेणेकरून ती तिचा प्रियकर साहिलला कायमस्वरूपी सोबत ठेवू शकेल. (In Bollywood, the actress played the role of a villain and won many awards)

प्रियांका चोप्रा
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही रुपेरी पडद्यावरील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या कारकिर्दीतील दुसराच चित्रपट ‘ऐतराज’ मध्ये खलनायिकेची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये ती पैसा आणि सत्तेच्या लालसेने उत्तेजित होते. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार हा नायक आहे आणि प्रियांका चोप्रा त्याची पूर्व प्रेमिका आहे. जी अचानक अक्षय कुमार आणि अभिनेत्री करीना कपूरच्या सुखी आयुष्यात परत येते. ऐतराज चित्रपटात प्रियांका चोप्रा एका श्रीमंत वृद्ध व्यक्तीशी लग्न करते. तर दुसरीकडे शारीरिक समाधान देऊन तिचे जुने प्रेम परत मिळवण्याचा प्रयत्न करत असते. या चित्रपटात प्रियांका चोप्राने उत्कृष्ट भूमिका साकारली होती. यातील तिच्या अदांनी चित्रपट उत्तम बनला होता.

 

त्यानंतर प्रियांका चोप्राने आणखी एकदा खलनायिकेची भूमिका साकारली आहे. ‘७ खून माफ’ या चित्रपटातील प्रियांकाच्या नकारात्मक भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटात स्त्रीला खलनायिकेची भूमिका करणे सोपे नव्हते. तरीही प्रियांका चोप्राने तिचे पात्र चांगले निभावले होते. ज्यात ती तिच्या ७ पतींचा खून करते.

कंगना रणौत
अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. कंगना एक अतिशय उत्तम अभिनेत्री आहे. तिनेही तिच्या कारकिर्दीत खलनायिकेची भूमिका केली आहे. ‘क्रिश ३’ चित्रपटात कंगना एका वेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आली होती. ज्यात ती खूप सुंदर दिसत होती, पण या चित्रपटात कंगनाने खलनायिकेची भूमिका साकारली होती. या चित्रपटात कंगनाच्या खास डिझाईन केलेल्या लूक आणि वेशभूषेने धुमाकूळ घातला होता.

विद्या बालन
विद्या बालनने पडद्यावर अनेक चांगले चित्रपट केले आहेत. परंतु २०१० मध्ये तिने अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘इश्किया’ चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली होती. ज्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते. विद्या एक बहुमुखी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या चित्रपटात तिने नसीरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी यांच्यासोबत छेडछाड करणाऱ्या विधवाची भूमिका केली होती. चित्रपटाला विविध पुरस्कार आणि प्रशंसा मिळाली होती.

तब्बू
जुन्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये धूमाकुळ घालणारी अभिनेत्री तब्बू हिने देखील खलनायिकेची भूमिका साकारली आहे. तब्बूने ‘अंधाधुन’ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप सोडली आहे. आयुष्मान खुराना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे आणि राधिका आपटे त्याची प्रेमिका आहे. तब्बूने या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा झी सिने पुरस्कार जिंकला आहे.

बिपासा बासू
सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे बिपाशा बासू. तिचे नाव बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिकेत अव्वल स्थानावर आहे. बिपाशाला अनेक वेळा विरोधी नायिका म्हणून पाहिले गेले आहे. तिने ‘जिस्म’ आणि ‘राज ३’ या चित्रपटांमध्ये खलनायिका म्हणून काम केले आहे.

जिस्म चित्रपटात बिपाशाने एका अब्जाधीश व्यावसायिकाच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ज्यात तिचे बाहेरच्या पुरुषासोबत संबंध होते आणि या प्रेमप्रकरणामुळे तिला तिच्या प्रियकराकडून मारले जाते. तर दुसरीकडे बिपाशाने ‘राज ३’मध्येही नकारात्मक भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. ज्यासाठी तिला प्रशंसा पुरस्कार देण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग बॉसच्या घरात असणाऱ्या शमिता शेट्टीला विंदू दारा सिंगने दिला पाठिंबा म्हणाला, ‘ती खूप स्ट्रॉंग…’

-सैफ अली खानने भाड्याने दिले त्याचे फॉर्च्युन हाइट्समधील घर; ‘इतके’ पैसे मिळूनही दरवर्षी वाढत जाणार रेंट

-खरंच की काय! जेह देखील आहे ‘लाल सिंग चड्ढा’च्या रोमँटिक गाण्याचा भाग? करीनाने केला खुलासा

हे देखील वाचा