Saturday, June 29, 2024

दृष्टिहीन हिमानी बुंदेला बनली करोडपती; पण ७ कोटी जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच, तुम्हाला येतंय का उत्तर?

प्रत्येक व्यक्तीला सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पाहायला खूप आवडतो. कौन बनेगा करोडपतीचा १३ वे पर्व टीव्हीवर २४ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. त्याचबरोबर ताजनगरीच्या शिक्षिका हिमानी बुंदेलानीने केबीसी १३ मध्ये तिचे धैर्य आणि ज्ञान सिद्ध केले आहे. हिमानी या हंगामातील पहिली करोडपती बनली आहे. हिमानी बुंदेला करोडपती बनण्याचा भाग ३० ऑगस्ट रोजी सोनी टीव्हीवर प्रसारित झाला. हिमानी आणि तिचे कुटुंबीय याबद्दल खूप आनंदी आहेत. आज हिमानीने कोणतीही लाईफलाईन न वापरता उत्कृष्ट कामगिरी करत एक कोटी रुपये कमावले आहे. मात्र, हिमानीचे सात कोटी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी हिमानीला सात कोटीसाठी प्रश्न विचारला होता. तो हा होता की, ‘डॉ बी आर आंबेडकर यांच्याकडून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचे शीर्षक काय होते, ज्यासाठी त्यांना १९२३ मध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळाली?’ (In the 13th season of ‘Kaun Banega Crorepati’, this woman became a millionaire)

याचे पर्याय होते, १. भारताची इच्छा आणि साधन, २. रुपयाची समस्या, ३. भारताचे राष्ट्रीय लाभांश, ४. कायद्याचे नियम. त्याचबरोबर या प्रश्नाचे अचूक उत्तर ‘रुपयाची समस्या’ होते.

शोची पहिली विजेती बनलेली हिमानी एक दिलदार आणि बिनधास्त मुलगी आहे. हिमानी बुंदेला आग्राच्या गुरू गोविंदनगर येथील रहिवासी आहे. ती व्यवसायाने शिक्षिका आहे. मुलांना शिकवण्याबरोबरच ती आपल्या शाळेतील अपंग मुलांसाठी एक जनजागृती कार्यक्रम देखील चालवते. हिमानी ही दृष्टिहीन आहे, पण असे असूनही, तिला मुलांच्या जीवनाला प्रकाश देण्यासाठी देशभरात अनेक कार्यक्रम सुरू करायचे आहेत, पण नेहमी तिच्या शब्दांनी आणि हास्याने प्रकाश पसरवणाऱ्या हिमानी आधीच अंध नव्हती, पण एका अपघाताने तिची दृष्टी गेली.

वयाच्या १५ व्या वर्षी झाला अपघात
हिमानी बुंदेलाचा वयाच्या १५ व्या वर्षी अपघात झाला, ज्यामुळे तिची दृष्टी गेली होती. या अपघातानंतर हिमानी खचून जाणे हे स्वाभाविक होते, पण तिच्या कुटुंबाने तिची साथ सोडली नाही. विशेषत: तिच्या वडिलांनी आणि मोठ्या बहिणीने तिला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा दिला आणि प्रोत्साहित केले.

व्हायचे होते डॉक्टर
हिमानी लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. तिला मोठी झाल्यावर डॉक्टर व्हायचे होते, पण या अपघातात तिची दृष्टी गेल्यामुळे तिचे स्वप्न भंगले, .पण कुटुंबाने तिला अभ्यास आणि पुढे जाण्यास नेहमीच मदत केली होती. पदवीनंतर हिमानीने बीएड करण्याचा निर्णय घेतला. तिची ही पदवी पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय विद्यालयात निवड झाली. तिने शाळेत शिकवायला सुरुवात केली. मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांना जागरूक करण्यासाठी ती वेगवेगळे कार्यक्रम राबवते.

यापूर्वी १२ व्या हंगामात, चार लोक करोडपती झाले. विशेष म्हणजे या चारही महिला होत्या. १३ व्या पर्वामध्येही अशीच सुरुवात दिसू शकते. १३ व्या पर्वात १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर हिमानी बुंदेला पहिली करोडपती झाली आहे.

हा शो ‌२००० साली स्टार प्लस या वाहिनीवर चालू झाला होता. नुकतेच या रियॅलिटी क्वीझ शोने त्याचा २१ वर्षाचा प्रवास पूर्ण केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरने धोती आणि कुर्ता अशी केली पुरुषी वेशभूषा, वडील अनिल कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री

-सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत

हे देखील वाचा