Monday, July 1, 2024

मराठी दिग्दर्शकाची आत्म’हत्या, चित्रपटसृष्टीवर शोककळा

कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्म’हत्या करत आयुष्य संपवलं आहे. ते 58 वर्षांचे होते. त्यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या निधनामुळे मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नितीन देसाई हे प्रसिद्ध कला दिग्दर्शक तर होतेच, पण त्यासोबतच ते अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकदेखील होते. आता त्यांच्या निधनामुळे सोशल मीडियाद्वारे नेटकरी शोक व्यक्त करत आहेत.

सोशल मीडिया पोस्ट
एका ट्विटर युजरने ट्वीट करत लिहिले की, “अत्यंत धक्कादायक! आधुनिक युगाचा विश्वकर्मा काळाच्या पडद्याआड, प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, कर्जतच्या एनडी स्टुडिओ येथे गळफास घेतला.”

याव्यतिरिक्त आणखी एका युजरने प्रश्न उपस्थित करत लिहिले की, “प्रचंड धक्कादायक व अस्वस्थ करणारी बातमी आहे. डोळे दिपविणारे देखणे सेट्स उभारणाऱ्या व्यक्तीच्या मनातील काळोख कोणाला दिसला नसेल?”

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत केलं काम
आत्म’हत्या करून आयुष्य संपवणाऱ्या नितीन देसाई (Nitin Desai) यांनी अनेक हिट हिंदी चित्रपटांचे सेट उभे केले होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील सर जेजे कला महाविद्यालयातून प्रकाश चित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. सन 1987पासून त्यांच्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे, त्यांना ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या चित्रपटांच्या कला दिग्दर्शनाची जबाबदारीही पार पाडली.

नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांची कारकीर्द 20 वर्षांची राहिली. यादरम्यान त्यांना राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा, संजय लीला भन्साळी आणि आशुतोष गोवारीकर यांसारख्या उत्कृष्ट दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. उल्लेखनीय बाब अशी की, नितीन यांना तब्बल 4 वेळा सर्वोत्तम कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच, 3 वेळा त्यांना कला दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त नितीन देसाई यांनी सन 2005मध्ये मुंबईच्या जवळ असलेल्या कर्जत भागात 52 एकरात पसरलेला एनडी स्टुडिओ सुरू केलेला.

हेही वाचाच-
‘शेतीच्या कामाला बैल, कष्टाच्या कामाला गाढव आणि विकासाच्या कामाला *** लागतो’, सयाजी शिंदेचा व्हिडिओ व्हायरल
‘बिग बॉस’फेम सोनाली पाटीलने लग्नाविषयी मांडले स्पष्ट मत; म्हणाली, ‘लव्ह मॅरेज…’

हे देखील वाचा