Thursday, June 13, 2024

‘शेतीच्या कामाला बैल, कष्टाच्या कामाला गाढव आणि विकासाच्या कामाला *** लागतो’, सयाजी शिंदेचा व्हिडिओ व्हायरल

सध्याच्या जगात सोशल मीडियाने लोकांना एकमेकांच्या जवळ आणले आहे. हातात मोबाईल पडला की, कदाचित सर्वजण सोशल मीडिया ऍप्सकडे जाण्याला प्राधान्य देतात. जसे की, इंस्टाग्राम आणि फेसबूक. सोशल मीडियाचा वापर करणारे फक्त सामान्य लोकच नसतात, तर जगभरातील क्रिकेटपटू, राजकारणी, व्यावसायिक, कलाकार यांचाही यामध्ये समावेश असतो. याद्वारे ते आपल्या आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतात. तसं पाहिलं, तर कलाकारांचे सोशल मीडिया वापराचे प्रमाण जास्त आहे. कारण, ते त्यांच्या चाहत्यांसोबत जवळपास प्रत्येक गोष्ट शेअर करतात. मग यात अनेक गंभीर आणि मजेशीर प्रकारचे फोटो तसेच व्हिडिओही असतात. अशातच आता मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवलेले अभिनेते सयाजी शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे इंस्टाग्राम (Sayaji Shinde Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलेच सक्रिय असतात. त्यांनी नुकताच मंगळवारी (दि. 01 ऑगस्ट) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते जे काही म्हणत आहेत, त्यामुळे चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सयाजी शिंदे (Sayaji Shinde) त्यांच्या व्हिडिओत म्हणत आहेत की, “मुळात शेतीच्या कामाला बैल लागतो, कष्टाच्या कामाला गाढव लागतो आणि विकासाच्या कामाला तर कायम घोडाच लागतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayaji Shinde (@sayaji_shinde)

सयाजी शिंदेचा हा व्हिडिओ आता नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून त्यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 32 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओला 30 हजारांहून अधिक लाईक्स आणि 300हून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.

एका युजरने हसणाऱ्या इमोजीचा समावेश करत कमेंट केली की, “खरं हाय, विकासाला घोडाच लावला की.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “एकदम बरोबर शिंदे साहेब.” आणखी एकाने असेही म्हटले की, “आजचं कटू सत्य प्रत्यक्षात सयाजी शिंदे स्टाईलमध्ये.” एका युजरने लिहिले की, “खरं हाय मालक.”

सयाजी शिंदे यांचे चित्रपट
सयाजी शिंदे यांनी आजपर्यंत 250हून अधिक वेगवेगळ्या भाषेतील सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सयाजी शिंदे अखेरचे ‘घर बंदूक बिर्याणी’ या सिनेमात झळकले होते. या सिनेमात त्यांच्यासोबत नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर हे प्रसिद्ध कलाकारही होते. त्यांचा ‘आणी बाणी’ हा सिनेमा 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. (marathi actor sayaji shinde latest video viral on social media see here)

हेही वाचाच-
अभिनेत्री मानसी नाईकने पहिल्या चित्रपटासाठी घेतले ‘इतके’ कमी मानधन, जाणून घ्या आकडा
‘बिग बॉस’फेम सोनाली पाटीलने लग्नाविषयी मांडले स्पष्ट मत; म्हणाली, ‘लव्ह मॅरेज…’

हे देखील वाचा