Sunday, April 14, 2024

‘बिग बॉस’फेम सोनाली पाटीलने लग्नाविषयी मांडले स्पष्ट मत; म्हणाली, ‘लव्ह मॅरेज…’

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली पाटील होय. ती बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते,ती नेहमी फोटो, रील्स पोस्ट करते. ट्रेडिंग गाण्यावर रिल्स बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. आता सोनालीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामधुन लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तिचं उत्तर चाहत्यांनी देखील आवडलं आहे. चाहत्यांनी सोनालीला सल्ला देखील दिला आहे.

अभिनेत्री सोनाली पाटीलनं (Sonali Patil) नुकताच एक रील पोस्ट केला आहे. या रीलमध्ये सोनालीला विचारलं जात की, ‘तू लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज.’ तर ती म्हणते की, ‘नो मॅरेज.’ सोनालीनं ही रील पोस्ट करताना सुद्धा ‘नो मॅरेंज’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

या रीलवर अभिनेता विकास पाटीलने प्रतिक्रिया देत लिहिलं की, ‘आईचा फोन आला होता परवा..मुलं बघ आमच्या सोनासाठी म्हणून’. तसेच सोनालीच्या चाहत्यांनी सुद्धा या रीलवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, ‘उत्तर एकदम बरोबर आहे. एकटा जीव सदाशिव’ तर काहींनी तिला लग्न करूच नको असा सल्ला दिला आहे.

सोनालीने बिग बॉस मराठी सीझन 3मध्ये वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना सांगितले होते की, ती कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहे, ती त्या व्यक्तीसोबत कमिटेड आहे. तो व्यक्ती बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तिची वाट पाहत असल्याचंही असे ती म्हणाली होती. दरम्यान सोनालीने नंतर मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मौन बाळगले आणि त्याबद्दल काहीही उघड केले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Patil (@sonale_paatil42)

 दरम्यान, सोनालीनं ‘बिग बॉस मराठी’ पूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘वैजू नंबर वन’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर ती ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या मालिकामध्ये झळकली होती. एवढंच नाहीतर सोनालीनं हिंदी मालिकेतही काम केलं. ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेत ती दिसली होती. (Sonali Patil of ‘Bigg Boss’ fame expressed her clear opinion about marriage)

अधिक वाचा- 
अभिनेत्री मानसी नाईकने पहिल्या चित्रपटासाठी घेतले ‘इतके’ कमी मानधन, जाणून घ्या आकडा
तब्बल २५ खोल्यांच्या बंगल्यात राहणाऱ्या ‘या’ अभिनेत्याने केवळ एका चुकीमुळे बाकीचे आयुष्य घालवले चाळीत

हे देखील वाचा